पिंपरी चिंचवड : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. टेम्पोने अचानक ब्रेक दाबल्यानंतर ट्रकने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील 100 कोंबड्या दगावल्याचं वृत्त आहे. खंडाळा परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. (Pune Mumbai Express Way Khandala Accident Truck hits Tempo kills hundreds of Chicken)
कोंबड्यांपासून मद्यापर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे अपघात झाल्यानंतर त्यांची पळवापळवी होत असल्याचं आधीही अनेकदा दिसलं आहे. यावेळी मात्र दुर्दैवाने अपघातग्रस्त टेम्पोमधील कोंबड्या दगावल्या.
नेमकं काय घडलं?
पुण्याहून मुंबईच्या दिशेने कोंबड्यांची वाहतूक केली जात होती. पहाटे 5 वाजता प्रवास सुरु असताना खंडाळा परिसरात कोंबड्यांनी भरलेल्या टेम्पोने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागील ट्रकची जोरदार धडक टेम्पोला बसली. यामध्ये शेकड्याच्या संख्येने कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचा दावा केला जात आहे. या अपघातात ट्रक चालकही जखमी झाला असून ट्रकचंही मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे.
उस्मानाबादेत ट्रक उलटून विद्युत उपकरणं चोरीला
उस्मानाबादमध्ये ट्रक उलटल्यानंतर त्यातील इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. पादचारी आणि गावकऱ्यांनी तब्बल 70 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा दावा केला जात आहे. ही उपकरणं परत मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं.
सोलापूर-औरंगाबाद हायवेवर ट्रक उलटला
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ हा अपघात झाला होता. “ट्रकमध्ये मोबाईल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही, खेळणी अशी विद्युत उपकरणे होती. अपघातानंतर ती रस्त्यावर पडली, तेव्हा गावकऱ्यांची त्या वस्तू उचलण्यासाठी झुंबड उडाली. काही जणांनी कंटेनरचा दरवाजा उघडून वस्तू लांबवल्या. स्थानिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाला बोलवावं लागलं.” अशी माहिती ट्रक चालकाने दिली होती.
संबंधित बातम्या :
कोंबड्यांचा ट्रक उलटला, पळवापळवीसाठी नागरिकांची झुंबड, 300 कोंबड्यांची लूट
साताऱ्यात कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, तब्बल 600 कोबड्यांचा मृत्यू
उस्मानाबादेत ट्रक उलटला, 70 लाखांचे एलईडी, मोबाईल गावकऱ्यांनी पळवल्याचा दावा
(Pune Mumbai Express Way Khandala Accident Truck hits Tempo kills hundreds of Chicken)