Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-मुंबई महामार्गावर ११ गाड्यांच्या अपघातांच्या आठवणी ताज्या, पुन्हा असाच झाला अपघात

Pune-Mumbai Expressway : पुणे, मुंबई महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहे. सोमवारी एक्स्प्रेस वे वर काही वाहनांचा विचित्र अपघात झाला. मानवी चुकीमुळे झालेल्या या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर ११ गाड्यांच्या अपघातांच्या आठवणी ताज्या, पुन्हा असाच झाला अपघात
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 2:26 PM

पुणे | 21 ऑगस्ट 2023 : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अनेकदा अपघात होत असतात. परंतु एप्रिल महिन्यात ११ वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघाताच्या वेळी अकरा वाहने एकमेकांवर धडकली होती. आहेत. एक्स्प्रेस वेवरील खोपोली एक्झिटजवळ झालेल्या या अपघाताची आठवण करुन देणारा अपघात सोमवारी झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहे. अपघातानंतर वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

कसा झाला अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठा अपघात झाला आहे. पुणे शहराकडून कंटनेर मुंबईकडे जाण्यासाठी निघाला होता. कंटनेरचा प्रवास 35 किलोमीटर झाला. त्यावेळी विरुद्ध लेनमध्ये कंटनेर घुसला. त्यानंतर एकामागे एक पाच वाहनांना धडक दिली. या धडकेत मारुती डिजायर (MH48 A6512) या गाडीचा चालक आणि त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे अजून स्पष्ट झाली नाही. या अपघातात पाच जण जखमी झाले आहे. जखमी झालेल्या व्यक्तींना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खोपोली फूड मॉलजवळ पुणे लेनवर ही घटना घडली.

अपघातानंतर वाहतुकीवर परिणाम

सोमवारी झालेल्या या अपघातानंतर वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरु आहे तर पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. दरम्यान या अपघातामुळे २७ एप्रिल रोजी झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहे. त्या अपघातात ११ वाहने एकमेकांवर आदळली होती. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक ट्रकने अकरा वाहनांना धडक दिल्यानंतर हा भीषण अपघात झाला होता.

आयटीएमएस प्रमाणी ऑक्टोंबरपर्यंत

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर आता वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी आयटीएमएस प्रणाली बसवण्याचे काम सुरु आहे. या प्रणालीमुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाईल. सुमारे ४५० कॅमेऱ्यांची नजर २४ तास वाहनांवर राहणार आहे. वाहनांनी ठरवून दिलेली मार्गिका सोडल्यास त्वरित मेसेज कंट्रोल रुममध्ये जाईल. त्यानंतर कंट्रोरुमधून महामार्ग पोलिसांकडे ही माहिती जाईल. त्यानंतर मार्गिका सोडलेल्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.