देशातील टॉप 10 व्यस्त मार्गात पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, रोज किती वाहने जातात?

Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग हा देशातील सर्वात दहा व्यस्त महामार्गांपैकी एक ठरला आहे. दोन्ही शहरांमधील वाढत जाणाऱ्या वाहतुकीमुळे हा महामार्ग नेहमी गजबजलेला असतो. सुट्टीच्या दिवशी त्यावर अधिकच गर्दी असते.

देशातील टॉप 10 व्यस्त मार्गात पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, रोज किती वाहने जातात?
प्रतिकात्मक फोटोImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 11:56 AM

रणजीत जाधव, पिंपरी चिंचवड : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या महामार्गावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. पुणे आणि मुंबई प्रवाशांसाठी जुना व नवीन असे दोन मार्ग असले तरी नियमित जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे या महामार्गाचा समावेश देशातील टॉप 10 व्यस्त मार्गामध्ये झाला आहे. या मार्गावरील आरक्षणाच्या संख्येतही 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन्ही शहरातील अंतर कमी करण्यासाठी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा (Lonavala) ते खोपोली (Khopoli) दरम्यान एका बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे.

काय आहे सर्व्हेक्षण

देशातील सर्वात व्यस्त 10 मार्गांमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस-वे चा समावेश करण्यात आला आहे. रेडबसने केलेल्या सर्वेक्षणात 2022 या वर्षाच्या तुलनेत वर्ष 2023 च्या वीकेंडमध्ये मुंबई पुणे महामार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या आरक्षणामध्ये 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ह्या एक्सप्रेस हायवेची लांबी 94 किलोमीटर असून या महामार्गावरून रोज किमान 50 हजार वाहने धावतात. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवारी हा आकडा वाढून 70 ते 80 हजार इतका होतो.

देशातील सर्वाधिक टोल

देशातील सर्वाधिक मोठा असलेल्या यमुना एक्स्प्रेस वे पेक्षाही जास्त टोल मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आकारला जात आहे. 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार टोलच्या दरात 18 टक्के वाढ 1 एप्रिल 2023 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जाताना आता वाढीव टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे. परंतु ही दरवाढ देशात सर्वाधिक आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रतिकिलोमोटीर 1.73 रुपये टोल कारसाठी आकारला जातो. तो मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर तब्बल 3.40 रुपये प्रतिकिलोमीटर आहे. इतका टोल देशात कुठेही नाही.

किती आहे टोल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा 94 किलोमीटरचा आहे. त्यासाठी आता 320 रुपये लागणार आहे. म्हणजे हा दर3.40 रुपये प्रतिकिलोमीटर होतो. नागपूर-शिर्डी हा 520 किलोमीटर मार्गासाठी कारचा दर 900 रुपये आहे. म्हणजेच तो प्रति किलोमीटर 1 रुपये 73 पैसे आहे. उत्तर प्रदेशातील यमुना एक्प्रेस हा सर्वात मोठा मार्ग आहे. त्या ठिकाणी 2 रुपये 65 पैसे इतका दर प्रतिकिलोमीटर आहे.

टोल असे आहेत

चार चाकी वाहन

320 रुपये

टेम्पो

 495 रुपये

ट्रक

685 रुपये

बस

940 रुपये

थ्री एक्सल वाहन

 1630 रुपये

एम एक्सल वाहन

 2165 रुपये

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.