pune mumbai expressway | पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीतून दिलासा, चांदणी चौकात प्रथमच असे…

pune mumbai expressway | विकेंड आणि गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांच्या गर्दीमुळे शनिवार, रविवारी पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या महामार्गावर चार, पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होता. आता सोमवारी दिलासा मिळाला आहे.

pune mumbai expressway | पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीतून दिलासा, चांदणी चौकात प्रथमच असे...
Pune Mumbai Express WayImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 8:48 AM

पुणे | 18 सप्टेंबर 2023 : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर वीकेंडला नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. सलग सुट्यांमुळे शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी झाली. या दोन दिवसांत चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा बोरघाटात लागल्या होत्या. परंतु सोमवारी बोरघाटामधील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळला आहे. बोरघाट परिसरात आज वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईवरुन पुण्याला येणारी आणि पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जात असल्यामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतूक वाढली होती.

पुणे शहरात मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीवर मोकोका

पुणे शहरात मुलाचे अपहरण करुन खून करणाऱ्या ओंकार कापरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी कोंढवा येथील १६ वर्षीय मुलाचे अपहरण केले होते. त्यानंतर त्या मुलाचा मृतदेह दिवेघाटाजवळ आढळून आला होता. आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे कोंढवा व वानवडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन

गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री विविध ठिकाणी छापे टाकून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी दोन हजार ५४४ संशयितांची झाडाझडती घेऊन ७५७ गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. याऑपरेशनमध्ये ५५० हॉटेल, लॉज आणि ढाबे तपासण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

खेडशिवापूर टोल नाक्यावर चालकांचे स्वागत

राष्ट्रीय चालक दिनानिमित्त पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल नाक्यावर पोलिसांकडून चालकांना पेढे आणि गुलाबपुष्प देत सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिसांनी वाहन चालकांना रस्ते वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. वाहतुकीचे सर्व नियम पाळून वाहन चालवणाऱ्या चालकांचे पोलिसांकडून विशेष कौतुक करण्यात आले. खेडशिवापूर येथील राजगड पोलिसांकडून हा उपक्रम राबवण्यात आला.

शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी तुषार कामठे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची वर्णी लागली आहे. तुषार कामठे हे काही दिवसांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुषार कामठे यांची पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदासाठी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, काशिनाथ नखाते यांची नावे चर्चेत होती.

पुणे चांदणी चौकात मिळाला दिलासा

पुणे येथील चांदणी चौकातील वाहतूककोंडीतुन पुणेकरांना रविवारी दिलासा मिळाला. चांदणी चौकात प्रथमच वाहतूक वाहतूक सुरळीत सुरु झाली. पुणे, बंगरुळू महामार्गासह चौकात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक सुरळीत झाली. चांदणी चौकात तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा असतात. परंतु रविवारी हे चित्र दिसले नाही. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले होते.

'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.