पुणे विमानतळ 14 दिवसांसाठी बंद, गैरसोय टाळण्यासाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा, मुंबईला जाण्यासाठी खर्च?
धावपट्टी बंद झाल्यामुळे 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान पुणे विमानतळावरील व्यावसायिक कामकाज 14 दिवसांसाठी ठप्प आहे. याच कारणामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई आणि पुणे दरम्यान खासगी हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुणे : धावपट्टी बंद झाल्यामुळे 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान पुणे विमानतळावरील व्यावसायिक कामकाज 14 दिवसांसाठी ठप्प आहे. याच कारणामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई आणि पुणे दरम्यान खासगी हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रवास फक्त 40 मिनिटांचा असेल.
प्रवासासाठी खर्च किती येणार ?
पुण्यातील खराडी ते मुंबईतील जुहूपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास करायचा असेल तर प्रति व्यक्ती 15,000 रुपये खर्च येईल. दररोज उपलब्ध होणारी ही सेवा balde या खासगी कंपनीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उड्डाण कोठून कुठपर्यंत, वेळ काय ?
हेलिकॉप्टर वाहतूक सेवा सकाळी 9.30 आणि संध्याकाळी 4.30 वाजता अनुक्रमे खराडी आणि जुहू येथून उड्डाण करतील. नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ही हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे 14 दिवस बंद राहणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे बंद राहणार आहेत. लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सप्टेंबर 2020 पासून हाती घेण्यात आलं आहे. 26 ऑक्टोबरपासून या कामाचा महत्वाचा टप्पा सुरु झाला होता. तेव्हापासून लोहगाव विमानतळावरुन रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मागील वर्षभर या विमानतळावरुन फक्त दिवसाच उड्डाणं होत होती. मात्र आता 16 ऑक्टोबरपासून 16 दिवस तिही बंद होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरुन प्रवासी उड्डाणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुणे विमानतळावर लवकरच 5 लाख चौरस फुटांचं टर्मिनल
पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. त्यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेतला होता.
इतर बातम्या :
शिवसेनेची रणरागिणी चाकणकरांच्या मदतीला धावली, मनीषा कायंदेंकडून चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार
चित्रा वाघ यांची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका?@ChitraKWagh @ChakankarSpeaks #RupaliChakankar #ChitraWagh #Maharashtra #BJP #NCP #Tweet
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/m6nb1Z2FPA
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2021