पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी, कशामुळे झाली एवढी ट्रॅफीक जाम?

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई महामार्गावर शुक्रवारी विचित्र अपघात झाला. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका हजारो वाहनधाराकांना बसला आहे. वाहतूक कोंडी तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी, कशामुळे झाली एवढी ट्रॅफीक जाम?
traffic jam mumbai pune express way
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 9:36 AM

पुणे : पुण्यात वाहतूक कोंडी (Pune Traffic Issue) ही एक गंभीर समस्या बनली आहे. पुण्यात जिथे जाल तिथे तुम्हाला वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. पुण्याप्रमाणे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Pune-Mumbai Expressway) वाहतूक कोंडी होत असते. शुक्रवारी पुन्हा मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुण्यावरुन मुंबईला जाणारी मार्गिका विस्कळीत झाली आहे. त्यातच बोरघाटात सकाळी अपघातही झाला आहे.

कुठे झाली वाहतुकीची कोंडी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. आता ही वाहतूक कोंडी फोडण्याचं आव्हान महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलिसांना बोरघाटात तैनात करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

बोरघाटात पाहाटे अपघात

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात पुन्हा एकदा ट्रकचा ब्रेकफेल झाला. यामुळे विचित्र अपघात झालाय. बोरघाट उतरत असताना ब्रेकफेल झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक तिसऱ्या लेनवर पलटला. पहाटे चारच्या सुमारास खोपोली परिसरात हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. 27 एप्रिलला ट्रकचा असाच ब्रेकफेल झाल्यानेच विचित्र अपघात झाला होता.

मुंबईकडे येणाऱ्यांना त्रास

मुंबई-पुणे महामार्गावर अनेक लोक रोज मुंबईच्या दिशने प्रवास करत असतात. यामुळे आधीच या मार्गावर वाहतूक जास्त असते. त्यामध्ये मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली आहे. तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली निर्माण झाली आहे.

महामार्गावर अपघाताच्या घटना

मुंबई-पुणे महामार्गावर अनेक अपघाताच्या घटनाही घडतात. मागील आठवड्यात विचित्र अपघात झाला होता. एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.