मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, १६० कोटींचा कसा आहे प्रकल्प

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर वारंवार अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी आता मोठे पाऊल उचलले आहे. या मार्गावर आता अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. परिवहन विभाग, महामार्ग पोलिस व ‘एमएसआरडीसी’ने त्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, १६० कोटींचा कसा आहे प्रकल्प
pune mumbai old highway
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 9:38 AM

पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस मागील आठवड्यात कोसळली होती. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातानंतर शासन-प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी मोठी योजना हाती घेतली आहे. सुमारे १६० कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे अपघात टळणार आहे अन् लाख मोलांचे जीव वाचणार आहे. या महामार्गावर नियम तोडणे चालकांना चांगलेच महागात पडणार आहे, कारण त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञान असणार आहे.

आयटीएमएस यंत्रणा

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आयटीएमएस म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसविण्यात येणार आहे. आता परिवहन विभाग, महामार्ग पोलिस व ‘एमएसआरडीसी’ने त्यासाठी हालचाली सुरु केल्याय. यासाठी लवकरच सर्व्हेला सुरुवात होणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे तंत्रज्ञान

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर आता वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. वाहनांनी ठरवून दिलेली मार्गिका सोडू नये यासाठी ‘आयटीएमएस’ काम करणार आहे. वाहतुकीची शिस्त पाळणे, अपघात टळाणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणार

  • नेमके काय असणार
  • मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे लावले जाणार आहे. यामुळे प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.
  • वाहनांचा वेग तपासण्यासाठी ‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ असणार
  • वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ‘लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’
  • काय आहेत नियम
  • डावीकडून जाणारी लेन क्रमांक १ अवजड माल वाहतुकीच्या वाहनांची. त्यांच्या वेगाची मर्यादा प्रतितास ८० किलोमीटर आहे.
  • त्याच्या बाजूची अर्थात उजवीकडची लेन क्रमांक २ हलकी अर्थात चारचाकी वाहनांसाठी, वेगमर्यादा १०० किलोमीटर
  • तिसरी लेन ओव्हरटेकची असून, पुढे जाऊन पुन्हा आपल्या निर्धारित लेनमधूनच प्रवास करायचा

काय झाले होते

शनिवारी १५ एप्रिल रोजी एक खासगी बस पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. पहाटे चारच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. चालकाचा ताबा सुटल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात बसचा तोल गेला. त्यानंतर ही बस दरीत कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला  होता. त्यानंतर आता प्रशासनाने या मार्गावर अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.