पुणे-मुंबई ट्रेन जाणार सुसाट, हा एक बदल केल्याचा प्रवाशांना फायदा

Pune News | मध्य रेल्वेने पुणे-मुंबई प्रवास दरम्यान एक महत्वाचा बदल केला आहे. या बदलाचा फायदा प्रवाशांना होणार आहे. रेल्वे मार्गात रेल्वे आता थांबणार नाही. मुंबई लोकल प्रमाणे पुणे-मुंबई मार्गावर हा बदल करण्यात आला आहे. यामुळे दोन रेल्वे दरम्यान अंतराचा जो नियम होतो, त्यातही बदल करण्यात आला आहे.

पुणे-मुंबई ट्रेन जाणार सुसाट, हा एक बदल केल्याचा प्रवाशांना फायदा
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 1:55 PM

पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | पुणे ते मुंबई नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रस्ते मार्ग प्रवासापेक्षा रेल्वे मार्गाने अनेक जण प्रवास करतात. रेल्वे मार्गाने केलेल्या प्रवाशामुळे वेळ वाचतो. तसेच कमी पैशांत प्रवास होतो. आता मध्य रेल्वेने पुणे-मुंबई प्रवास दरम्यान एक महत्वाचा बदल केला आहे. या बदलाचा फायदा प्रवाशांना होणार आहे. रेल्वे मार्गात रेल्वे आता थांबणार नाही. मुंबईप्रमाणे पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान पुणे-लोणावळा मार्गावर ६४ किलोमीटरपर्यंत स्वयंचलित सिग्नलिंगचे काम पूर्ण झाले आहे.

यामुळे वाचणार वेळ

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या जास्त आहे. हजारो जण या मार्गावरुन प्रवास करतात. या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवली आहे. ही यंत्रणा नसताना सुपरफास्ट गाड्यांना सिग्नल न मिळाल्याने विलंब होत होता. तसेच एक्स्प्रेस गाड्यांना पासिंग मिळण्यासाठी दोन स्थानक दरम्यान थांबा घ्यावा लागतो. दुसरे गाडीचे पासिंग मिळाल्यावर इतर गाड्यांना हिरवा सिग्नल मिळतो. त्यानंतर एक्स्प्रेस गाडी मार्गावर धावण्यास सुरुवात होते. मात्र, स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे एक किलोमीटर अंतरात गाड्या थांबू शकतात. मुंबईत लोकलसाठी ही यंत्रणा वापरली जाते. त्यानंतर पुणे-मुंबई मार्गावर ही यंत्रणा आली आहे.

हे काम होते अपूर्ण

काही दिवसांपूर्वी खडकी ते पुणे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. हा मेगा ब्लॉक दरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम रेल्वेने पूर्ण केले. हे काम पूर्ण झाल्यामुळे पुणे-लोणावळा विभागात ६४ किलोमीटरचे स्वयंचलित सिग्नल झाले आहेत. यामुळे या मार्गावर गाड्यांचा वेगही वाढणार आहे. पुणे-लोणावळा मार्गावर नऊ नवीन ट्रॅक सर्किट बसवण्यात आले आहेत. खडकीत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम करण्यात आले आहे. तसेच शिवाजीनगर येथील पॅनेल इंटरलॉकिंगमध्ये बदल केला आहे. यामुळे आता पुणे-लोणावळा विभागात रेल्वे गाड्या धावण्याची क्षमता वाढणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय होणार फायदा

नवीन सिग्नल प्रणालीमुळे रेल्वे स्थानकावर थांबा घेण्याऐवजी दर एक किलोमीटरवर थांबा घेऊ शकतात. म्हणचे दहा किमी अंतरावर दहा गाड्या थांबू शकतात. यामुळे रेल्वे स्थानकावर गाड्यांची होणारी गर्दी कमी होईल. स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे रेल्वे वेगाने धावणार आहे. त्यामुळे गाड्यांची संख्याही वाढणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.