पुणे – शहरात वेगवान वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. शहरात कोरोनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असतानाच दुसरीकडे रेल्वे स्थानकांवर बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांच्या स्क्रीनींगला सुरुवात करण्यात आली आहे. या स्क्रिनिंगमध्ये एखाद्या प्रवाश्याला जर लक्षणे आढळून आली तर त्याची आरटीपीसीआर चाचणी, केली जाणार आहे. असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
चाचणीसाठी सेल्फ टेस्ट किटचा पर्याय
कोरोनाच्या लक्षणासाठी आता तपासणी केंद्रावर न जाता घराच्या घरी सेल्फ टेस्ट किटची सुविधा उपलबद्ध झाली आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात याची खरेदी केली जात आहे. या किटकला आयसीएमआरची मान्यता असल्याने खरेदीसाठी मात्र या किटचा वापर करुन टेस्ट केल्यावर अनेकजणांचा चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर प्रशासनला माडॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज भासत नाहीत. तसेच हे किट ऑनलाईन देखील खरेदी करता येत आहे,.हिती कळवत नाहीत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतोय अशी चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं या किटचा वापर करुन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, अस आवाहन पुणे फार्मासिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलेकर यांनी केलं आहे.
बारामतीत रुग्णसंख्येत वाढ
दुसरीकडं बारामतीमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.. तालुक्यात दोन दिवसांत तब्बल 144 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.. बारामती शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक विना मास्क वावरताना पहायला मिळत आहेत यामुळे प्रशासन आणि बारामतीकरांची चिंता वाढलीय..यामुळे आता बारामतीत नो मास्क, नो एंट्री, नो व्हॅक्सीन, नो एंट्री ची कठोरपणे अंमलबजावणी होणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिलीआहे आहे.
शिल्पा शेट्टी मुलगी समिशाला देतेय भूतदयेचे धडे, जखमी कावळा बघून शिल्पाच्या लेकीने जोडले हात
Corona : कोरोनाचा परिणाम कृषी विद्यापीठांवरही, काय आहेत राज्य शासनाचे आदेश?