Clashes on mahametro project| पुणे महापालिकेत संभाजी पुलावरील महामेट्रोच्या कामावरून सत्ताधारी व विरोधक भिडले

मेट्रोच्या खांबांमुळे गणेशोत्सव काळातील देखाव्यांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मेट्रोच्या खांबांची उंची वाढवावी अशी मागणी गणेश मंडळांनी केली आहे. मात्र या मागणीमुळे मेट्रोच्या कामाचा खर्च तब्बल ७०कोटी रुपयांनी वाढणारा आहे. तसेच यासाठी जवळपास ३९ खांबांची निर्मिती जास्तीची करावी लागणार आहे. यासाठी महामेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी तब्बल दोन वर्षांनी वाढणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

Clashes on mahametro project|  पुणे महापालिकेत संभाजी पुलावरील महामेट्रोच्या कामावरून सत्ताधारी व विरोधक भिडले
पुणे महानगरपालिका
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 6:32 PM

पुणे- पुण्यातील छत्रपती संभाजी पुलावरील मेट्रोचे काम गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे.मध्यंतरी महापौर मुरलीधर मोहळ यांनी मध्यसती करूनही हा वाद मिटला नाही परिणामी आज महापालिकेत त्यावरून पुन्हा सभागृहात वादावादी झाली. गणेश मंडळाची बाजू घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे यांनी सभागृहात गोंधळ घातला. बांधकामाची उंची वाढवाण्यावरून आज महानगरपालिकेत गणेश मंडळ आणि महाविकास आघाडीसह मनसे आक्रमक झालेली दिसून आली. गणेश मंडळ कार्यकर्ता व महामेट्रो अधिकारी यांच्यात वादावादी होत, वाद इतका विकोपाला गेला की शिवीगाळ करण्यात आली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब केले.

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला कार्येकर्तेच देतायत खो याबाबत पत्रकार परिषद घेत मुरलीधर मोहळ यांनी सविस्तर माहिती दिली, ”अजित पवारांनी पोलीस देखरेखीत पुणे मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतीत स्पष्ट उल्लेख मेट्रोनं पुणे महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे. जेव्हा लकडी पुलावरचं मेट्रोचं काम थांबवण्यात आलं त्यानंतर या कामावर आक्षेप घेणाऱ्या शहरातील गणेश मंडळांसोबत महापालिका प्रशासनाची बैठक झाली. गणपती मिरवणूक या पुलावरुन जाताना मेट्रोमुळे अडचण येईल म्हणून हे काम रोखण्यात आलं होतं. मात्र मेट्रोचं काम सुरु राहील, असं या बैठकीत ठरलं. तेव्हा गणेश मंडळं या निर्णयावर तयारही झाली होती. तरीही मेट्रोचं काम सुरु होऊ नये म्हणून गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी पुलावर जाऊन आंदोलनं केलीत. ज्यानंतर गणेश मंडळांनी मेट्रो कामाबाबतीत सुचवलेले पर्याय आणि मेट्रोची बाजू जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो पदाधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा केली. ज्यानंतर बैठकीत ठरलेल्या बाबींची माहिती मेट्रोकडून एक पत्र लिहून पुणे महापालिकेला देण्यात आलीये. एकीकडे उपमुख्यमंत्री मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी महापालिका सभागृहात गोंधळ घालतात.” असा आरोप मुरलीधर मोहळ यांनी केला आहे.

नेमका वाद काय ? छत्रपती संभाजी पुलावरील मेट्रोच्या खांबांमुळे गणेशोत्सव काळातील देखाव्यांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मेट्रोच्या खांबांची उंची वाढवावी अशी मागणी गणेश मंडळांनी केली आहे. मात्र या मागणीमुळे मेट्रोच्या कामाचा खर्च तब्बल ७०कोटी रुपयांनी वाढणारा आहे. तसेच यासाठी जवळपास ३९ खांबांची निर्मिती जास्तीची करावी लागणार आहे. यासाठी महामेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी तब्बल दोन वर्षांनी वाढणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

Devendra Fadnavis Live | महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु : देवेंद्र फडणवीस

India vs South Africa : कसोटी मालिकेपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला झटका, ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे संघाच्या बाहेर

Crime | तृतीयपंथीयांचा रास्तारोको! 24 तासांत दोघां तृतीयपंथीयांच्या हत्येमुळे जाळपोळ, तोडफोड

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.