Pune Municipal Elections : पुण्यात आज ‘आप’चा मेळावा, पालिका निवडणुकीचं रणशिंगण फुंकलं जाणार

पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी मैदानात असून त्यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Pune Municipal Elections : पुण्यात आज 'आप'चा मेळावा, पालिका निवडणुकीचं रणशिंगण फुंकलं जाणार
पुणे महापालिका निवडणूकImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 11:32 AM

पुणे : राज्यात महापालिका निवडणुकांची (Municipal Elections) तयारी जोरदार सुरू आहे. महापालिका निवडणुक तोंडावर आहे. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत येत्या काळात पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत नुकतीच प्रक्रिया पार पडलीय. यानंतर आता पुण्यातूनच एक बातमी समोर आली आहे. पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी मैदानात असून त्यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. आप पक्षाकडून पुण्यात आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मेळाव्याला दिल्ली सरकारमधील ‘आप’चे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर प्रीती मेनन, निवडणूक प्रमुख महादेव नाईक यांचीही उपस्थिती असणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. मेळाव्याच्या माध्यमातून आप पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे.

नुकतीच पुणे महापालिकेची सोडत झाली

आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण नुकतंच निश्चित झालंय. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठीचे तर पिंपरी चिंचवड शहरातील 46 प्रभागांचे आरक्षण जाहीर झालंय. महापालिकेची सदस्यसंख्या 173 आहे. तर महिला आरक्षण असल्याने महिलांची सदस्यसंख्या 87 एवढी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मनसेची भाजपाशी युती?

पुणे महापालिकेची रंगत वाढत आहे.  आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाशी युती करायची की नाही, याचा संपूर्ण निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेतील, असं मागे बोललं गेलंय. शहरातील कार्यकर्त्यांना भाजपाशी युती करण्याची भावना आहे. तरी राज ठाकरे हेच याविषयी निर्णय घेतील, असे मागे वसंत मोरे म्हणाले आहेत. नऊ प्रभागांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यात मी चांगली संख्या आणेल. बाकी शहराची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते काय करतात, हे पाहावे लागेल, असंही ते म्हणले होते.

पुणे महानगरपालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण पाहूया

– अनुसूचित जाती

– एकूण जागांची संख्या – 173

– पैकी महिलांकरिता आरक्षित जागा – 12

पुणे महापालिका अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग

  • प्रभाग 9 – येरवडा
  • प्रभाग 3 – लोहगाव, विमाननगर
  • प्रभाग 42 – रामटेकडी, सय्यदनगर
  • प्रभाग 47 – कोंढवा बुद्रुक
  • प्रभाग 49 – मार्केटयार्ड, महर्षीनगर
  • प्रभाग 46 – महम्मदवाडी उरळी देवाची
  • प्रभाग 20 – पुणे स्टेशन, आंबेडकर रोड
  • प्रभाग 26 – वानवडी, वैदुवाडी
  • प्रभाग – 21 कोरेगाव पार्क, मुंढवा
  • प्रभाग 48 – अप्पर इंदिरानगर
  • प्रभाग 10 शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी
  • प्रभाग – 4 खराडी वाघाली

अनुसूचित जमाती

– एकूण जागांची संख्या – 173

– पैकी महिलांकरीता आरक्षित जागा – 01

अनुसूचित जमाती

  • प्रभाग 1 क्र. – 1 ब महिला
  • प्रभाग 14 अ – एसटी खुला

सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)

– एकूण जागांची संख्या – 173

– पैकी महिलांसाठी आरक्षित जागा – 74

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.