कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-नगर महामार्ग 31 डिसेंबर रोजी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

राज्यातील कोरोनाची स्थिती आणि कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त कोरेगाव-भीमा येथे उसळणाऱ्या जनसमुदायाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्ग दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (pune nagar highway closed for two days, district collector issue order)

कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-नगर महामार्ग 31 डिसेंबर रोजी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 7:23 AM

पुणे: राज्यातील कोरोनाची स्थिती आणि कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त कोरेगाव-भीमा येथे उसळणाऱ्या जनसमुदायाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्ग दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2021च्या रात्री 12 वाजेपर्यंत हा महामार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. (pune nagar highway closed for two days, district collector issue order)

कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमत्त कोरेगाव-भीमा येथे दरवर्षी 1 जानेवारी रोजी हजारो भीम अनुयायी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळते. सध्या राज्यात सुरू असलेला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शौर्य दिनाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून त्याचा भीम अनुयायांनाच धोका होऊ शकत असल्याने खबरादारीचा उपाय म्हणून 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2021च्या रात्री 12 वाजेपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

पासधारकांनाच परवानगी

कोरेगाव-भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमा येथे आंबेडकरी जनतेची गर्दी उसळून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने काही सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणी बाहेरच्या लोकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे पास आहे, अशा लोकांनाच कोरेगाव-भीमा येथे प्रवेश देण्यात येणार असल्यचा सूत्रांनी सांगितलं.

एल्गार परिषदेला परवानगी नाकारली

दरम्यान, येत्या 31 डिसेंबरला पुण्यात होऊ घातलेल्या एल्गार परिषदेला स्वारगेट पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे (नाईट कर्फ्यू) कारण देत पुणे पोलिसांकडून या परिषदेला परवानगी नाकारल्याचे सूत्रांनी सांगितलं. परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून गणेश कला क्रीडा मंडळामध्ये एल्गार परिषद घेऊ, असे म्हटले होते. त्यासाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात त्यांनी अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी सध्याच्या परिस्थितीत एल्गार परिषदेला परवानगी देता येणार नाही, असे सांगत हा अर्ज फेटाळून लावला आहे.

आयोजक ठाम

आम्हाला राज्य सरकारने परिषदेची परवानगी द्यावी. सरकारने परवानगी नाकारल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही जाऊ. सर्वोच्च न्यायालयानेही परिषदेला परवानगी नाकारली तरी आम्ही परिषद घेणारच असं सांगतानाच आम्ही तुरुंग, मरण वगैरे गोष्टींना घाबरत नाही, असा इशारा एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी दिला होता. (pune nagar highway closed for two days, district collector issue order)

एल्गार परिषद वादाच्या भोवऱ्यात का?

डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर हा तपास एनआयएने ताब्यात घेत देशभरात डाव्या विचारांच्या अनेक बुद्धिजीवींना अटक केली. यावरुन देशभरात डाव्या विचारांच्या लोकांनी मोठं काहूर माजवलं होतं. (pune nagar highway closed for two days, district collector issue order)

संबंधित बातम्या:

सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेऊच; तुरुंग, मरणाला घाबरत नाही: कोळसे-पाटील

मोठी बातमी: पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली

(pune nagar highway closed for two days, district collector issue order)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.