पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मनमाड-इंदूर होणार?

पुणे अन् नाशिक शहर रेल्वेने जोडण्याची अपेक्षा अनेक वर्षांपासून आहे. फेब्रुवारी महिन्यात पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला सरकारकडून तत्वतः मान्यता देण्यात आली होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत या प्रकाल्पाचे घोडे पुढे जात नाही. अजूनही हा प्रकल्प कागदावर आहे.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मनमाड-इंदूर होणार?
गतिमान युगाची नांदी
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 5:50 PM

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातून नाशिकला (Nashik- Pune) जाण्यासाठी सरळ रेल्वे मार्ग नाही. यामुळे या ठिकाणी सेमी हायस्पीड ट्रेनने (Pune Nashik high Speed Train) सुरु करण्याची घोषणा झाली आहे. मध्यंतरी महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (महारेल) ने भूसंपादनाचे काम थांबवण्याचे पत्र दिले होते. नाशिक जिल्हाधिकारींना निधी नसल्यामुळे हे काम थांबण्यात आदेश दिले होते. त्यानंतर शासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या अन् महारेलने ते पत्र मागे घेतले. परंतु या मार्गासाठी पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. हा प्रकल्प अजूनही कागदावरच आहे.

पुणे नाशिक रेल्वे अद्याप कागदावरच

फेब्रुवारी महिन्यात पुणे- नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वेला सरकारकडून तत्वतः मान्यता देण्यात आली होती. परंतु पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. यामुळे पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 16 हजार 39 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. ज्या प्रमाणे गेले काही दशकांपासून मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची चर्चा सुरु आहे, त्याचप्रमाणे पुणे-नाशिक प्रकल्पाची फक्त चर्चाच राहणार आहे, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे.

फडणवीस यांची मध्यस्थी

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वे मंत्रालयाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला परवानगी न दिल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर हा रेल्वे मार्ग होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून समस्या सोडवल्या. परंतु अजूनही रेल्वेची तांत्रिक मंजुरी मिळाली नाही.

काय आहे वैशिष्ट्ये

  • पुणे नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा हा रेल्वे प्रकल्प
  • पुणे जिल्ह्यातील जवळपास 54 गावांमधून जाणार रेल्वे
  •  235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
  • रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
  •  रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग
  • पुढे हा वेग 250 किलोमीटरपर्यंत वाढवणार
  •  पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
  • वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प
  • पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
  • 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.