पुण्यात मास्क न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड, कोरोनाची नवी नियमावली जाहीर

पुणे शहरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. (Pune New Corona Guidelines)

पुण्यात मास्क न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड, कोरोनाची नवी नियमावली जाहीर
मास्क
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 11:29 PM

पुणे : मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुण्यातील वाढता कोरोना लक्षात घेता शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. (Pune New Corona Guidelines Penalty for not wearing mask)

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासंह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार पुणे शहरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुण्यात सलग दुसऱ्यांदा मास्क न घातलेल्या व्यक्तींकडून एक हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.

पुण्यात पहिल्यांदा एखादा व्यक्ती मास्क न घालता आढळल्यास 500 रुपये दंड करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा तोच व्यक्ती जर मास्क न घालता आढळला, तर त्याच्याकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. यासाठी पुणे पोलिसांकडे आधीपासूनच व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक 

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ लागला आहे. आज (19 फेब्रुवारी) राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांचे नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 44 हजार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्यार राज्यातील मृत्यूदर 2.48 टक्के इतका आहे. तर दुसरीकडे आज 2 हजार 159 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 89 हजार 963 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतके आहे.

?मुंबई-पुण्याला कोरोनाचा विळखा?

मुंबईत आज दिवसभरात 823 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 3 लाख 17 हजार 310 इतका झाला आहे. आज दिवसभरात मुंबईत 5 जणाचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ पुणे शहरात दिवसभरात 211 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे मनपात दिवसभरात 535 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 259 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे मंडळात एकूण 1165 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुणे, पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, सोलापूर, सोलापूर मनपा, सातारा याचा समावेश आहे.

मुंबईकरांसाठी काळजी केंद्र, महापौर पेडणेकरांचं मिशन झिरो

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. यापुढे कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय महापौर पेडणेकर यांनी घेतला.  कोरोनाचं नव्याने वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगसाठी महापौरांनी हे पाऊल उचललं. इतकंच नाही तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

दरम्यान, आता गृह विलगीकरणात कुणाला न ठेवत आता आम्ही सर्वांना काळजी केंद्रात ठेवणार आहोत. तसंच परदेशातून येणारे आणि पळून जाणाऱ्या नागरिकांवर आम्ही गुन्हा दाखल केला जाणार आहे, असं महापौरांनी सांगितलं. (Pune New Corona Guidelines Penalty for not wearing mask)

संबंधित बातम्या : 

1 मार्चपासून नगरसेवकांना लस, स्वत:च्या कार्यक्रमांवर बंदी, मुंबईकरांसाठी काळजी केंद्र, महापौर पेडणेकरांचं मिशन झिरो

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विलगीकरण, महापौरांकडून हॉटेलची पाहणी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.