पुणे : पुणे जिल्ह्यातील एका आरोपीला चांगलीच शिक्षा मिळाली. हा व्यक्ती आपल्या भाऊ आणि वहिनीची हत्या करण्याचा प्रयत्न करुन पळून जात होता. परंतु त्याला काळानेच अशी शिक्षा दिली की भविष्यात काहीच होणार नाही. यामुळे ‘जैसी करनी वैसी भरनी’, चा प्रत्यय आला. सॉफ्टवेयर इंजिनिअर असलेल्या भाऊ आणि वाहिनीला यांना ठार करण्याचा प्रयत्न आरोपीने किरकोळ कारणांवरुन केला. पुणे जिल्ह्यातील आंबले गावात हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पुणे हादरले.
नेमके काय झाले
पुण्यातील सुनील बेंद्रे व प्रियंका बेंद्रे यांचे नवीन लग्न झाले. पुण्यात सुनीलचा चुलत भाऊ अनिल राहत होतो. परंतु तो वारंवार नोकरी सोडत होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला आपली शेती करण्याचा सल्ला दिला. त्यातून दोघांमध्ये वादही झाला होता. वडिलांना सुनीलनेच आपली नोकरी गेल्याचे सांगितले, असा समज अनिलचा झाला होता. त्यावरुन रविवारी वडिलांशी भांडण झाल्यानंतर त्याने एका रुममध्ये स्वत: ला कोंडून घेतले.
सुनील, प्रियंका आले गावी
सुनील बेंद्रे व प्रियंका बेंद्रे यांना लंडनमध्ये नोकरीचा संधी मिळाली. पण त्यापूर्वी अनिलशी सुरु असलेले भांडण मिटवण्यासाठी वडिलांनी दोघांना गावी बोलावले होते. यावेळी दोन्ही भावांमध्ये सविस्तर चर्चा झाली. सुनीलने त्याला व्यवस्थित समजावून सांगितले होते. यानंतर कुटुंब झोपले होते. मात्र सकाळ होताच आरडोओरडा सुरु झाला. अनिलने प्रियांका आणि सुनिलची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ सुनील बचावला होता. त्याला पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अनिलने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी अनिल दुचाकीवरून पळून जात असताना न्हावरे – चौफुला रस्त्यावर येणाऱ्या स्विफ्ट कारने त्याला धडक दिली. या धडकेत तोही गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुनीलची प्रकृती गंभीर
सध्या सुनिल यांचीही तब्येत गंभीर आहे. त्यांच्या छातीवर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.