cyber fraud : सावध व्हा, सायबर चोरट्यांनी यांना घातला १६ कोटींचा गंडा

pune cyber fraud : पुणे शहरात फसवणुकीच्या घटना वाढत जात आहेत. सायबर चोरट्यांकडून अनेकांची फसवणूक केली जातेय. सायबर ठगाने काही दिवासांपूर्वी माजी सैनिकाची सुमारे एक कोटीत फसवणूक केलीय होती. मूनलायटिंगच्या शोधात असणाऱ्यांची ही फसवणूक होत आहे.

cyber fraud : सावध व्हा, सायबर चोरट्यांनी यांना घातला १६ कोटींचा गंडा
Cybercrime-1Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 12:16 PM

पुणे : ऑनलाइन फसवणूक करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून देशभरात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. ऑनलाईन असणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून मूनलायटिंगच्या शोधात असणाऱ्या युवकांची फसवणूक करत आहेत. अनेक जण त्यांच्या सापळ्यात अडकताच त्यांची आयुष्यभराची कमाई जात आहे. परंतु हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण एक टक्का सुद्धी नाही. यामुळे सावध व्हा, इतकेच तुम्हाला म्हणावे लागणार आहे. कारण सायबर ठग फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार शोधत असून तुम्हाला जाळ्यात पकडत आहेत. पुणे शहरात गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रकार घडले आहे.

किती जणांची झाली फसवणूक

आयटी क्षेत्रात मूनलायटिंगचा प्रकार वाढत आहे. मूनलायटिंगच्या शोधात आलेल्या तरुणांना सायबर चोरटे फसवत आहेत. अनेकांची त्यात आयुष्यभराची पुंजी जात आहे. गेल्या चार महिन्यांत पुणे शहरात सायबर फ्रॉडच्या १३९ तक्रारी आल्या आहेत. त्यात तब्बल १५ कोटी ७० लाखांची फसवणूक झाली आहे. परंतु यामधील केवळ एकच गुन्ह्याचा तपास लागला आहे. म्हणजे हे प्रमाण एक टक्कासुद्धा नाहीय.

हे सुद्धा वाचा

काय आहे मूनलायटिंग

जेव्हा एखादा कर्मचारी त्याच्या नेहमीच्या कामासह दुसऱ्या ठिकाणी गुप्तपणे काम करतो तेव्हा त्याला ‘मूनलाइटिंग’ म्हणतात. या प्रकारला मूनलाइटिंग असे नाव देण्यात आले. अनेकांचे कार्यालयीन काम सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत असते. मग या वेळेनंतर अनेक जण दुसरे काम करण्यासाठी रात्रीची वेळ देतात. रात्री चांदणे असते, म्हणून त्याला मूनलायटिंग म्हणतात.

का करतात मूललायटिंग

पूर्वी कमी पगार असलेले लोक अतिरिक्त उत्पन्नासाठी अशी कामे करत होते, परंतु कोरोना नंतर, चांगले पगार मिळवणारे आयटी क्षेत्रातील कर्मचारी देखील ही कामे करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, आयटी कंपन्यांमध्ये घरून काम दिले जात असल्यामुळे ही संधी मिळते.

पोलिसांनी केले आवाहन

पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...