Pune News : विहिरीचं बांधकाम सुरु असताना मुरुम ढासळलं, चार कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले !

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे विहिरीचं काम सुरु असताना दुर्घटना घडली आहे. पोलीस, तहसिलदार, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे.

Pune News : विहिरीचं बांधकाम सुरु असताना मुरुम ढासळलं, चार कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले !
पुण्यात विहिर दुर्घटनेत चार कामगार अडकलेImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 4:05 PM

पुणे / 2 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीचं बांधकाम सुरू असताना रिंग पडून मुरुम ढासळले. यावेळी ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेल्याची घटना घडली. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सदर विहिर 120 फूट खोलं आहे. पोकलेनच्या सहाय्याने माती काढण्याचं काम सुरू आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. घटनास्थळी पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील उपस्थित आहेत.

विहिरीचं बांधकाम सुरु असताना घडली दुर्घटना

इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील रहिवासी विजय अंबादास क्षिरसागर यांची म्हसोबावाडी गावच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमिन आहे. या जमिनीत विहिरीच्या बांधकामाचे काम सुरु आहे. सदरची विहिर ही 120 फूट व्यासाची आणि 127 फूट खोल आहे. या विहिरीचं बांधकामाचं काम सुरु असताना काल रात्री त्यामध्ये रिंग पडली आणि मुरुम ढासळले. यामुळे ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेले आहेत. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण, मनोज मारुती चव्हाण अशी चौघांची नावे आहेत.

कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोकलेन मशिनच्या सहाय्याने मुरुम काढत कामगारांना बाहेर काढण्यासाठी काम सुरु आहे. रात्रीच्या सुमारास काम करताना कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती का याबाबत तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.