पुणे शहरात पुन्हा ED चे पथक, बँक घोटाळाप्रकरणी आरोपींवर कारवाई

अंमलबजावणी संचालनालयाने सेवा विकास सहकारी बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणात पुन्हा छापेमारी केली आहे. बँकेने १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांकडेही छापेमारी सुरु आहे.

पुणे शहरात पुन्हा ED चे पथक, बँक घोटाळाप्रकरणी आरोपींवर कारवाई
पुणे ईडी छापे
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 11:40 AM

पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे 450 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात ईडीने पुन्हा मंगळवारी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी आणि काळेवाडी फाटा परिसरात चार ठिकाणी आणि पुण्यातील औंधमध्ये एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण

सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही.

हे सुद्धा वाचा

यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळा उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.

ईडीची कारवाई

27 जानेवारी रोजी सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीने चार ते पाच ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी मूलचंदानी यांच्या घरावर छापा टाकला असता ते नऊ तास त्यांच्या बेडरूममध्ये लपून बसले होते.

आता पुन्हा कारवाई

अमर मूलचंदानी यांचे पिंपरी आणि औंध येथे राहणारे दोन नातेवाईक, त्यांचा पीए आणि पिंपरीत राहणारा एक कर्मचारी आणि काळेवाडी फाटा येथील आलिशान सोसायटीत राहणारे दोन जवळचे उद्योगपती आणि महापालिका कंत्राटदार बंधू यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहे. कारवाई दरम्यान ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुलचंदानी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयातील त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांनाही अटक केली होती. या कर्मचाऱ्यांनी मूलचंदानी यांना गोपनीय माहिती दिल्याचा त्यांच्यांवर आरोप आहे. तसेच त्यांनी गुप्त फाईल्स लीक केल्याचा त्यांच्यांवर आरोप आहे. या प्रकरणात सेवा विकास सहकारी बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्या चालकालाही ईडीने अटक केली होती.

हे ही वाचा

देशात ED किती झाली सक्रीय पाहा, छापेमारीतून तब्बल 95 हजार 432 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पुणे, मुंबईत ED ची छापेमारी, कोट्यवधींची संपत्ती केली जप्त

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....