पुणे शहराजवळ मधमाश्यांचा हल्ला, दहा जणांची प्रकृती गंभीर
Pune Bee attack : मधमाश्यांनी एकाच कुटुंबातील दहा जणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात १० जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुणे परिसरात मधमाश्यांच्या हल्ल्याचे प्रकार वाढले आहे.

पुणे : पुणे येथील सिंहगडाजवळ असलेल्या खामगाव मावळ येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी झाले आहे. या दहाही जणांवर किरकट वाडी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे कुटुंब भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करुन परत येत असताना मधमाश्यांनी त्यांच्यांवर अचानक हल्ला केला. या लोकांना स्वत:च्या बचावाची काहीच संधी मिळाली नाही. यामुळे हल्ल्यात सर्व जण गंभीर जखमी झाले आहेत.
दर्शन घेऊन परत येत होते
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता घडली. सांबरे वाडी परिसरात ही घटना घडली. खामगाव मावळ येथील एक कुटुंब आणि त्यांच्यां नातेवाईकांसोबत सांबरे वाडीत असणाऱ्या भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना त्यांच्यांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. यामुळे हे कुटुंब घाबरले. एकाच वेळी मोठ्या संख्येने मध्यमाश्या आल्यामुळे सर्व जण भेदरले. त्यांना बचावही करता आला नाही. माश्यांनी त्यांच्या संपूर्ण शरीरावर चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले. मधमाश्यांनी चावा घेतल्यावर अनेक जण जमिनीवर अत्यवस्थ होऊन पडले होते. त्या सर्वांना किरकट वाडी फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
यापूर्वी घडल्या घटना
गेल्या वर्षी जूनमध्ये सिंहगड किल्ल्यावर मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 पर्यटक जखमी झाले होते. त्यात एक लहान मुलगाही होता. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्याजवळील कातळधर धबधब्यावर ट्रेकसाठी गेलेल्या 11 जणांवर मधमाशांनी हल्ला केला होता, त्यात आठ जण गंभीर जखमी झाले होते.
मागील वर्षी 3 मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर गेलेल्या किमान 200 पर्यटकांना मधमाश्यांनी चावा घेतला होता. त्यापैकी किमान 25 जणांना वैद्यकीय मदतीची आवश्यक होती. गेल्या वर्षी 24 एप्रिल रोजी पुण्यातील राजगड किल्ल्यावरील 100 फूट खोल दरीत मधमाशांच्या थव्याने पर्यटकांवर हल्ला केला होता.
उन्हाचा होता मधमाश्यांना त्रास
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. ऊन कडक असल्यामुळे मधमाश्या मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. हे मधमाश्यांचे पोळ कधी उठेल ते सांगता येत नाही.