Rohit Pawar : सरकार एसीमध्ये बसून धोरण ठरवतंय, युवकांवर अन्याय होतोय, आम्ही लढणार- रोहित पवार
Karjat Jamkhed MLA Rohit Pawar on Yuva Sangharsh Yatra : युवकांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष नाही. तरूणांना रोजगार नाही. शिक्षणाचा प्रश्न आहे. त्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. देशात 30 टक्क्यांपेक्षा जास्त बेरोजगारी आहेत, असं रोहित पवार म्हणाले. ते युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत.
अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे | 09 ऑक्टोबर 2023 : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे युवकांच्या प्रश्नांना घेऊन आक्रमक झाले आहेत. ते युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी याची माहिती दिली. युवा संघर्ष यात्रेला आम्ही सुरवात करत आहोत. शरद पवारसाहेबांसोबत चर्चा झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला आहे. युवांचा आवाज आणि युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी ताकत दिली आहे. या यात्रेची ऑफिशियल वेबसाईट आज लॉन्च करण्यात येणार आहे. मला सुध्दा अनेक वर्ष संघर्ष करावा लागला आहे. युवकांचे प्रश्न हे प्रखर पद्धतने राज्य सरकार मांडत नाहीत. राज्यात आणि केंद्रात मोठी बेरोजगारी आहे. देशात आणि राज्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त बेरोजगारी आहे. अनेक तरुणांच्या हाताला काम नाहीये. आज आपल्या राज्यात दीड लाख पेक्षा जास्त इंजिनीयर्स पास होत आहेत. पण अनेकांना काम मिळत नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर रोष व्यक्त केला.
सध्याचं सरकार एसीमध्ये अधिकाऱ्यांसोबत बसून धोरण ठरवत आहेत. कंत्राटी पद्धतीने भरती करणं, हा अन्याय आहे. खाजगी कंपन्या कुणाच्या आहेत हे सर्वांना माहिती आहे. आताचे राज्यकर्ते खोटं बोलत आहेत. धोरण विद्यार्थांच्या बाजूने ठरवली जात नाहीत. त्यामुळे एकुण 22 मुद्दे घेऊन संघर्ष यात्रा काढणार आहोत. युवकांचा आवाज बनून ही यात्रा काढणार आहोत. युवकांचे आणि सामान्य लोकांचे मुद्दे घेऊन पदयात्रा काढणार आहोत. 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत यात्रा असेल, असं रोहित पवार म्हणालेत.
अनेक विद्यार्थी अधिकारी होण्याचं स्वप्न बघतात. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी येतात. तिथं देखिल अजब कारभार सुरू आहे. नुसता गोंधळ घातला जात आहे. परीक्षा भारतीत मोठा घोळ घातला जात आहे. पेपर वेळेवर घेण्यात यावेत. एमपीएसहीमार्फत परीक्षा व्हाव्यात आणि भरती देखील व्हावी. युवा पिढी सिरीयस नाही, असं राज्य सरकार म्हणत आहे, हे योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.
अनेक एमआयडीसीमध्ये कंपनी नाहीत. जिथं आहेत तिथं उद्योग नाही. अनेवेळा एमआयडीसीमध्ये राजकरण केलं जात आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मोठे प्रकल्प हे राज्याच्या बाहेर गेले आहेत. सरकार कुठेलही नवी धोरण आणत नाही. आयटी कंपनी फक्त मोठ्या शहरात आणल्या जातात. पण मग छोट्या शहरात राहणाऱ्या युवकांचं काय? गावात राहणाऱ्या माझ्या बांधवांचं काय?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.