पुणे जिल्ह्यात शेतात महिला झोपली होती, बिबट्याने झेप घेतली अन् काय झाले पाहा

पुणे जिल्ह्यात बिबट्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. परिसरातील बिबटे शहरापर्यंत अन् शेतापर्यंत येऊन पोहचत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. जिल्ह्यातील एका शेतात बिबट्याने महिलेवर हल्ला केला आहे. शेतकऱ्यांनी वनअधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

पुणे जिल्ह्यात शेतात महिला झोपली होती, बिबट्याने झेप घेतली अन् काय झाले पाहा
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 5:28 PM

पुणे : मानव आणि बिबट्या यांच्यांत संघर्ष सुरु असतो. जंगलात खाद्य मिळत नसल्यामुळे बिबटे अनेक ठिकाणी शहराकडे आपला मोर्चा वळवत आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे. पुणे जिल्ह्यातील एका शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. महिला रात्री शेतात झोपली असताना तिच्यावर हल्ला झाला आहे.  आता बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. परंतु या प्रकारामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याचा मागील तीन वर्षांपासून अधिक काळ पुणे जिल्ह्यातील नेरे, जांबे आणि कासारसाई भागामध्ये खुलेआम वावर आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील स्थानिक नागरिक करत आहे. मात्र वनविभाग सातत्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने बिबट्याची दहशत या भागात अजूनही पाहायला मिळत आहे.

महिला शेतात झोपली अन् काय झाले

हे सुद्धा वाचा

जुन्नर तालुक्यातील ओतूरमधील शेतकरी भगवान महादेव तांबे यांच्या शेतात कापणी करण्यासाठी रवीता किराडे ही महिला आली होती. तिच्यासह मध्य प्रदेशातील काही मजूरही होते. सकाळी कापणी झाल्यावर त्या शेतात झोपल्या होत्या. त्यावेळी बिबट्या आला. तो शिकारीसाठी पळत होता. त्याचवेळी बिबट्याने केलेली शिकार त्याच्या तावडीतून सुटून पळाली. यावेळी बिबट्याची झेप त्या महिलेच्या डोक्यापर्यंत आली. त्यात ती जखमी झाली. तिला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले.

वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी

वन विभागाचे अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी या भागात असलेल्या बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानंतर आता या ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार आहे.

हिंजवाडेत घुसला बिबट्या

पुणे येथील हिंजेवाडीत एक बिबट्या घुसला. त्याने घरात बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. कुत्रा आपला जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होता. परंतु बिबट्यापुढे त्याचे प्रयत्न अपूर्ण पडले. चैनने बांधलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना भीती वाटप आहे.

बिबट्याने पुणे शहरात घुसून पाळीव कुत्र्याची केली शिकार, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.