पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पुणे शहर तिहेरी हत्याकांडानं हादरलं आहे. हे हत्याकांड एकाच कुटुंबातील आहे. सख्ख्या दिरानेच आपली वहिनी आणि तिच्या दोन चिमुकल्यांची हत्या केलीय. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. आरोपीने त्याची २५ वर्षीय वहिनी अन् तिच्या ४ आणि ६ वर्षीय मुलाची हत्या केल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रूर कृत्यानंतर मृतदेह जाळले
३० वर्षीय आरोपीचे तिच्या वहिनीशी अनैतिक संबंध होते. मात्र आरोपीला तिच्या वहिनीचे आणखी कोणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्यांच्यामध्ये वाद झाला. वादानंतर रागाच्या भरात त्याने वहिनीला आणि तिच्या सहा अन् चार वर्षांच्या मुलीस संपवले. त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या तिघांचे मृतदेह घरातील कपडे, बेडशीट व लाकडच्या साह्याने पेट्रोल टाकून जाळले. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान 302 व 201 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन महिन्यापूर्वी मुलाने मोबाईलसाठी केली आईची हत्या
पुण्यासारख्या सुस्कृतिक शहरात किरकोळ करणांवरुन हत्येचा प्रकार वाढत आहे. फेब्रवारी महिन्यात मुलाने आई मोबाईल देत नाही म्हणून तिची हत्या केली होती. पुणे जवळील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत हा प्रकार घडला होता. तस्लीम शेख या महिलेची हत्या झाली होती.
हे ही वाचा
मोबाईलच्या व्यसनाने हे काय केले, संतापाच्या भरात मुलाने केला आईचा खून