पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा नवा विक्रम, आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला

पिंपरी चिंचवड मनपाने मिळकत कराच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट आर्थिक वर्षासाठी ठेवले होते. परंतु या उद्दिष्टापर्यंत मनपा पोहचली नसली तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने यंदा विक्रम केला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा नवा विक्रम, आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 10:33 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत मनपा म्हणून ओळखली जाते. पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. त्यानंतरच चारच वर्षांत म्हणजे १९८६ मध्ये नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत झाले. आता या मनपाने नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. मनपाच्या चार दशकांचा इतिहासात प्रथमच असा विक्रम झाला आहे. अर्थात त्याला पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची मिळालेली साथ आणि अधिकाऱ्यांनी केलेले काम महत्वाचे आहे. यामुळेच हा टप्पा गाठला गेला आहे.

काय केले मनपाने

पिंपरी चिंचवड मनपाने मिळकत कराच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट आर्थिक वर्षासाठी ठेवले होते. परंतु या उद्दिष्टापर्यंत मनपा पोहचली नसली तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने यंदा विक्रम केला आहे. मनपाने कर संकलनातून 810 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.महापालिकेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ

गेल्या वर्षी महापालिकेने मिळकत कराच्या माध्यमातून 628 कोटी रुपये उत्पन्न मिळवलं होतं. यंदा त्यामध्ये 35 टक्के वाढ होत हे उत्पन्न 810 कोटीवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 182 कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळवण्यात कर संकलन विभागाला यश आले. यावर्षी हजार कोटीचे उद्दिष्ट नक्की पूर्ण करू असा विश्वास कर संकलन विभागाने व्यक्त केला.

मनपा भरतीसाठी उद्या परीक्षा

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सन 2021 च्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची उद्या २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी उमेदवारांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे परीक्षेसाठीचे हॉल तिकीट संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेला येताना लेखी परीक्षेसाठी असलेले हॉल तिकीटही आणावे लागणार आहे.

नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या पवना इंद्रायणी नद्यांच्या पात्रात असलेला जलपर्णीचा विषय कायम चर्चेत असतो. या जलपर्णीमुळे नदीचे सौदर्यं बिघडले. यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी केल्यानंतर जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली आहे. मोशी परिसरात महापालिकेकडून इंद्रायणी नदीतून जलपर्णी काढण्यास सुरुवात झालीय. यामुळे नागरिकांनी दिलासा मिळाला आहे.

पुणे, मुंबईकरांना शिंदे सरकारकडून मोठे गिफ्ट, काय होणार तुमचा फायदा…वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.