राजनाथ सिंह यांच्याकडून गिरीश बापट कुटुंबियांची भेट; म्हणाले, आम्ही…

DIAT चा पदवीदान समारंभ; कुलपती राजनाथ सिंह यांच्या हस्ते पदवी प्रदान; राजनाथ सिंह यांच्याकडून गिरीश बापट कुटुंबियांचीही भेट

राजनाथ सिंह यांच्याकडून गिरीश बापट कुटुंबियांची भेट; म्हणाले, आम्ही...
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 1:37 PM

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भेट दिली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन झालं. त्याच अनुषंगाने आज पुणे दौऱ्यावर असताना राजनाथ सिंह यांनी बापट कुटुंबीयांची सांत्वन्पर भेट घेतली आहे. यावेळी आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, असं राजनाथ सिंह म्हणाले.

पुण्यात DIAT अर्थात Defence Institute of Advanced Technology चा 12वा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. देशाचे संरक्षण मंत्री आणि DIAT चे कुलपती राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा पदवी प्रदान समारंभ पार पडला.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

DIAT या संस्थेने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केलं आहे. देशात आर्थिक,सामाजिक बदल घडत आहेत. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान यामुळे युद्ध कौशल्य बदलत आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये युद्धाच्या पद्धती बदलत आहेत. आता काही नव्या पद्धती सायबर किंवा स्पेस वॉर येत आहेत. यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहून तंत्रज्ञान अद्ययावत करण्यावर भर द्यायला हवा, असं राजनाथ सिंह म्हणाले.

संशोधन वाढवायला लागणार आहे. त्याच्या सरंक्षण संस्थेला फायदा होईल DIAT ने आपल्या स्थापनेपासूनच संशोधन आणि प्रशिक्षणात खूप चांगले काम केलं आहे. यामध्ये आता आणखी संशोधन होणं आवश्यक आहे आपल्या संरक्षण संशोधनात वाढ करायला हवी, तर याचा सर्वसामान्य नागरिकांनाही उपयोग होईल, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

सेल्फ रिलायन्स हे अतिशय महत्त्वाचे आहे. संपूर्ण जग ग्लोबल विलेज बनलं आहे. भारतसारखा देश इम्पोर्टवर अवलंबून राहू शकत नाही, असंही राजनाथ सिंह म्हणालेत.

देशाच्या हिताप्रमाणे आपल्याला संरक्षक संसाधनं बनवता आले पाहिजेत. आपण अनेक देशांना आज संसाधन देतोय. बाहेर पाठवतोय. 16 हजार करोड पेक्षा जास्त किमतीचे संसाधन आपण एक्सपोर्ट करतो. रायफल पासून ब्रह्मोसपर्यंत सगळं आपण बनवतो. आर्थिक स्थितीप्रमाणे आपण आज टॉप 5 मध्ये आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल, असा विश्वास राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

नेव्हीगेशन सिस्टीम असो वा प्लास्टिक सर्जरी याचे संशोधन पहिल्यांदा संरक्षण क्षेत्रात झाले. याचा सर्वाधिक उपयोग आता सर्वसामान्य नागरिकांना होतोय, असं म्हणत राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रातील कामाचं कौतुक केलं आहे.

तुम्ही असे तंत्रज्ञान तयार करा की ज्याचा वापर सर्वसामान्य नागरिकांनाही करता येईल. आपल्या गरजांची पूर्तता आपल्याला स्वतः करायची आहे. आपण जितकं आयात करतो तितके आपलं उत्पन्न घटतं. आत्मनिर्भर झाल्याने आपली अर्थव्यवस्था बळकट होईल. आपण संरक्षण क्षेत्रात किती उपकरणं बनवतो, त्यातील किती निर्यात करतो यावर ताकद वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.