नितेश राणे म्हणजे भाजपचे नाच्या!; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची जहरी टीका
Rupali Patil Thombre on Nitesh Rane : देवेंद्रजी यांना जरा समज द्या; नितेश राणे यांच्यावर कुणी डागलं टीकास्त्र?
पुणे : भाजपचे नेते नितेश राणे यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांची तुलना थेट नृत्यांगना गौतमी पाटील हिच्याशी करण्यात आली. त्याला महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.
नितेश राणे म्हणजे भाजपचे नाच्या! टिल्लू भाऊ बहुतेक नाच्या आहेत, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी भाजपचे नितेश राणे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
नितेश राणे काय म्हणाले होते?
नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. तसंच संजय राऊतांची तुलना थेट गौतमी पाटीलशी केली. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत! तिला बघायला जस लोकांना आवडतं, तसं यालाही वाटतं… हा गैरसमज दूर करायला हवा. गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपचं सामान याला पाठवून दे, असं नितेश राणे यांनी म्हटलं. त्याला रुपाली पाटील यांनी उत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पण सर्वात कमी निधी शिवसेनेच्या आमदारांना मिळायचा आणि तू भारतीय जनता पक्षाबद्दल बोलतो. उद्धव ठाकरेंचे भाऊ त्यांना जेवढा सन्मान देत नसतील तेवढा सन्मान उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस द्यायचे. संजय राऊतकडे असं काय आहे? एवढं नुकसान होऊन ही उद्धव ठाकरे त्याला सोडत नाही. माझ्या माहितीनुसार संजय राऊत उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करतो, असंही नितेश राणे यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
भाजपने राजकारणाचा स्तर खाली आणला आहे. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली की त्यांना प्रतिउत्तर करायला किंवा मनोरंजन करायला नितेश राणे सध्या सतत पत्रकार परिषदा घेत आहेत, असंही रुपाली पाटील म्हणाल्यात.
गौतमी पाटील ही तिच्या पोटासाठी काम करते. गौतमी पाटीलसोबत संजय राऊत यांची तुलना का करायची? तिच्या काही चुका असतील तर तिला आपण तिला त्या सांगितल्या आहेत. महिलांना हिणवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, असा सवाल रुपाली पाटील यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडी जरी सभ्यता राहिली असेल तर त्यांनी नितेश राणे यांना समज द्यावी. केंद्रात आणि राज्यातही सत्ता असताना भाजपचे लोक विकास कामचं बोलत नाहीत आणि नको त्याविषयांना तोंड फोडतात. हे योग्य नाही, असंही त्या म्हणाल्यात.