अभिजित पोते, पुणे : शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE च्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत निघाली. त्यानंतर शाळा प्रवेश सुरु झाली आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झाले नाही. ही प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. आरटीई अंतर्गत असलेल्या 25 टक्के राखीव जागांसाठी मुदत वाढवण्याची मागणी होत आहे. परंतु शासनाने त्यास नकार दिला आहे. यामुळे १५ मे पर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. यामुळे पालकांनी सर्व कामे सोडून आधी प्रवेश निश्चित करणे गरजेचे झाले आहे.
किती प्रवेश रखडले
शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांचे प्रवेश सुरु आहे. हे प्रवेश अंत्यत धीम्या गतीने सुरु आहे.
राज्यात ४० हजार तर पुण्यात ६ हजार प्रवेश रखडले आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी मंगळवार (ता.९) पर्यंत केवळ ५४ हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहे. म्हणजेच ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून त्यासाठी फक्त १५ मे पर्यंत मुदत आहे.
मुदत वाढवण्यास नकार
शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई प्रवेशाची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. त्यासाठी दिलेली मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. परंतु १५ मे ही शेवटची मुदत असेल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पालकांना आपली सर्व कामे सोडून आधी प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.
पुणे जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागणार आहे. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करावा, असेही आवाहन संचालनालयाने केले आहे.
5 एप्रिल 2023 रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची नावं जाहीर झाल्यानंतर 12 एप्रिल 2023 रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाला आहे.