पुण्यातील राष्ट्रवादीचे ते दोन आमदार अपात्र होणार?; शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून सध्या एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. डाव प्रतिडाव टाकण्याचा खेळ सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीचे ते दोन आमदार अपात्र होणार?; शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 1:51 PM

पुणे | 11 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादीचे दोन्ही गट पक्षात फूट पडली नसल्याचं सांगत असले तरी दोन्ही गटाकडून एकमेकांना शह काटशह देण्याचं काम सुरू केलं आहे. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. पक्ष आणि चिन्ह आपल्याच ताब्यात राहावा म्हणून दोन्ही गटाकडून कसून प्रयत्न होत आहे. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करून पक्षावर दावा केला जात आहे. आमचाच पक्ष खरा असल्याचा दावाही केला जात आहे. पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून आटापिटा सुरू असतानाच आता आणखी माहिती समोर आली आहे. पुण्यातील दोन आमदारांचं भवितव्य टांगणीला लावणारी ही बातमी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपात्र आमदारांच्या पाठवलेल्या यादीत पुण्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. सुनील टिंगरे आणि चेतन तुपे या दोन आमदारांची नावे आहेत. त्यामुळे या दोन्ही आमदारांची आमदारकी जाणार की राहणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, त्यावर चेतन तुपे यांनी याबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र अजितदादांसोबत असल्यानं अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उमेदवारांची चाचपणी सुरू

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आतापासूनच विधानसभा निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाने विधानसभेसाठीच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना हडपसर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पातळीवरूनच संबंधितांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आला आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

म्हणून तुपें ऐवजी जगताप

सध्या पुण्यातील हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे जाहीर केली नाही. मात्र तरी सुद्धा तुपे हे अनेक वेळा अजित पवार यांच्या कार्यक्रमाला आणि बैठकीला उपस्थित असतात. याच पार्श्वभूमीवर तुपे यांना डावलून शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा लढवण्याच्या सूचना दिल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.