काय म्हणताय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा फोटो

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही प्रमुख पक्ष आहेत. नंबर वनसाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न आहेत. यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याची आणि पक्षाची प्रसिद्धी करत असतो. आता इंदापूरमध्ये लावलेल्या बॅनरमध्ये दोन्ही पक्षांची नेते आहेत. त्यामुळे चर्चा सुरु झालीय.

काय म्हणताय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा फोटो
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 3:44 PM

योगेश बोरसे, पुणे : पुणे तेथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. नुकतेच पुणे शहरातील कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक झाली होती. यावेळी बॅनरवार चांगले रंगले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तासंघर्षावरील बॅनर पुणे शहरात लावले. त्यात चक्क सरन्यायाधीशांना उद्देशन लिहिले गेले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लोकशाही वाचवण्यासाठी विनंती केली त्या बॅनरमधून केली होती. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल न्यायाच्या बाजूने द्या, असे साकडे घातले होते. या बॅनरची चांगलीच चर्चा झाली होती. आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये लागलेले बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यात भाजप नेत्यांचा फोटो लावला आहे.

काय आहे बॅनर

हे सुद्धा वाचा

इंदापूर शहरात राष्ट्रवादीच्या बॅनरवरती चक्क भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावला आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या सोबतीला चंद्रकांत पाटील यांचा फोटो आहे. इंदापूर शहराला विकास कामांचा निधी दिल्याचे बॅनरवर म्हटले आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावत आभार मानले आहे. इंदापूर शहरात चौका चौकात आभाराचे बॅनर लावले आहे. शुभेच्छूक म्हणून राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी असल्याचे म्हटले आहे.

मग चर्चा तर होणारच

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही प्रमुख पक्ष आहेत. नंबर वनसाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न आहेत. यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याची आणि पक्षाची प्रसिद्धी करत असतो. परंतु इंदापूरमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यांबरोबर चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावला गेला आहे. यामुळे खमंग राजकीय चर्चा रंगली आहे. या बॅनरवरती राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया अद्याप आली नाही.

पुण्यात सरन्यायाधीशांना केले होते आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतेच पुणे शहरात सत्तासंघर्षावर बॅनर लावले होते. त्यात सरन्यायाधीशांना न्यायाच्या बाजूने निकाल देण्याचे आवाहन केले होते.

काय म्हटले होते त्या बॅनरमध्ये

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. आपण सर्व जाती धर्मातील लोक हे गर्वाने सांगतो. परंतु अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा केलेला गैरवापर आदी गोष्टींमुळे आपल्या देशात खरच लोकशाही उरली का? असा देशील प्रश्न पडतो. दिवसा ढवळ्या लोकशाही गाडून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या जनतेने उघड डोळ्यांनी पाहिले आहे. सत्ताधारी दडपशाहीने अधिकारांचा गैरवापर करुन हुकूमशाहीला पूरक असे वातावरण करत आहेत. अशा परिस्थितीत तमाम भारतातील जनता आपल्याकडे न्यायाची आस लावून बसली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा लढा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अंत्यत महत्वाचा आहे. आपण लोकशाही वाचवण्यासाठी योग्य तो निर्णय द्याल, याची खात्री आहे. अन्यथा भारतातील हुकूमशाहीची ही सुरुवात असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पुणे शहरात झळकले कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्टर..वाचा सविस्तर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.