pune gas blast | टँकरमधून गॅस चोरी करताना नऊ टाक्यांचा स्फोट…वाहने जळाली…विद्यार्थी बाहेर आले

pune gas cyclinder blast | पिंपरी चिंचवड शहरात राजरोसपणे गॅस चोरीचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार समोर आला. यामुळे एकामागे एक नऊ टाक्यांचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात मोठा हादरा बसला. वाहने जळून खाक झाली.

pune gas blast | टँकरमधून गॅस चोरी करताना नऊ टाक्यांचा स्फोट...वाहने जळाली...विद्यार्थी बाहेर आले
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 11:39 AM

रणजित जाधव, पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील पिंपरी चिंचवड भागात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. टँकरमधून गॅसची चोरी होत होती. त्यावेळी एकामागे एक गॅस टाक्यांचा स्फोट होऊ लागला. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील लोक घाबरले. रात्री झोपेत असताना उठून अनेक जण रस्त्यावर आले. या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलही आहे. त्यामुळे विद्यार्थीही बाहेर आले. पिंपरी चिंचवड येथील ताथवडे येथे ही घटना घडली आहे.

गॅस चोरीचा काळाबाजार समोर

पिंपरी चिंचवडमधील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. या घटनेत तीन ते चार स्कूल बस ही जळून खाक झालेल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये रविवार लागलेली भीषण आग ही गॅस चोरीच्या काळाबाजाराने लागल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. नऊ टाक्यांचा स्फोट झाल्यामुळे ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. त्याचवेळी आगीच्या रौद्ररूपामुळे गॅस चोरी करणाऱ्या लोकांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

विद्यार्थी बाहेर आले

गॅस टँकरचा स्फोट झाला त्या परिसरात शाळा, महाविद्यालये आहेत. यामुळे या भागांत अनेक हॉस्टेलसुद्धा आहेत. सुदैवाने स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या कचाट्यात परिसरातील घरे आली नाहीत. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मात्र यावेळी रस्त्यावर उभी असलेली शाळेतील तीन वाहने जळून खाक झाली आहेत. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

अग्नीशमन दलाने विझवली आग

रविवारी रात्री पावणे अकरा वाजता लागलेल्या आगीची माहिती त्वरित अग्नीशमन दलास देण्यात आली. त्यानंतर काही वेळेत अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर पावणे बाराच्या सुमारास आग नियंत्रणात आली. त्यानंतर गॅसच्या टाक्यावरील कुलिंग ऑपरेशनसाठी अजून एक तास लागला. पिंपरी चिंचवडमध्ये राजरोसपणे गॅस चोरीचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती या घटनेमुळे बाहेर आली. ही गॅस चोरी होत असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि गॅस एजन्सीला ही बाब लक्षात कशी आली नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.