पुणे : पुणे शहरात व परिसरात कोयता गँगने (koyta gang) धुमाकूळ घातला आहे. गुन्हेगारी मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर (Crime News) कारवाई केली असली तरी गुन्हे कमी होत नाही. कोयता गँगवर मकोका लावणे, कोंबिंग ऑपरेशन राबवणे, दहशतवाद्यांची यादी करणे अशी कामे पोलीस करत आहेत. परंतु त्यानंतरही गुन्हेगारी कमी होत नाही. आता पुणे परिसरातील पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी जोरदार मोहीम राबवली. या कारवाईमुळे अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये कारवाई
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकाने जोरदार कामगिरी केली आहे. विशेष मोहिम राबवून अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने 48 पिस्तुल जप्त केले आहे. तसेच 205 कोयते व अन्य धारधार शस्त्र अशी एकूण 253 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या 36 आरोपींवर तर घातक शस्त्रे वापरणाऱ्या 150 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.पोलीस आयुक्तालयातील विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्यांची नियुक्त या गँगला रोखण्यासाठी केली. विविध मोहीम राबवून कारवाई केली जात आहे.
कोयता गँगची दहशत
पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केली होती.
अजित पवार, सुप्रिया सुळेंकडून प्रश्न
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.