चालकाने बस थांबवली नाही, तो व्यक्ती बससाठी धावत होतो, मग संदेश आला अन् चालकाचे धाबे दणाणले

Pune News : बससाठी वाट पाहत उभे राहण्याचे काम सर्वसामान्यांना नेहमी करावे लागते. परंतु त्यानंतरही बस आल्यावर नियमित स्टॉपवर थांबली नाही तर...असाच अनुभव एका उच्चपदस्थ व्यक्तीला आला. मग सर्व सूत्र फिरली.

चालकाने बस थांबवली नाही, तो व्यक्ती बससाठी धावत होतो, मग संदेश आला अन् चालकाचे धाबे दणाणले
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 2:57 PM

पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याचे दिव्य अनेकांना करावे लागत आहे. अनेक जण बसची वाट पाहत थांबतात, बस आली की पकडण्यासाठी धावपळ करतात. परंतु बस स्टॉपवर थांबत नाही अन् सरळ पुढे निघून जाते. हा अनुभव घेणाऱ्यांमध्ये आणखी एका उच्चपदस्थ व्यक्तीची भर पडली आहे. परंतु त्यानंतर पीएमपीच्या सर्व बस चालकांचे धाबे दाणाणले. या प्रकाराची चांगलीच चर्चा पुणे शहरात सुरु आहे. या प्रकरणी त्या चालकावर कारवाईसुद्धा झालीय.

काय आहे प्रकार

सकाळची वेळ होती. एक व्यक्ती टी शर्ट परिधान करुन विश्रांतवाडी थांब्यावर बसची वाट होते. बस त्या थांब्यावर आली. ती बस रिकामी होती. परंतु चालकाने बस थांब्यावर थांबवली नाही. मग ते बसच्या मागे धावू लागले. परंतु बस थांबलीच नाही. परंतु काही वेळाने चक्र फिरली. त्या व्यक्तीने फोन लावताच पीएमपीच्या चालकांमध्ये खळबळ माजली. प्रवासाचा हा अनुभव घेणारे व्यक्त म्हणजे पीएमपीचे अध्यक्ष संचिद्र प्रताप सिंह होते.

५० रुपयांची पास काढली

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संचिद्र प्रताप सिंह यांनी ५० रुपयांची पास काढून पीएमपीमधून प्रवास केला. त्यावेळी त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. सिंह मनपा ते आळंदी बसमध्ये शिवाजीनगर स्थानकावरुन बसले. बसमध्ये त्यांना ओळखणारे कोणीच नव्हते. बसमध्ये गर्दी होती. त्यामुळे त्यांनी उभे राहून प्रवास केला. पुढे विश्रांतवाडीला उतरले. बसची वाट पहात थांबले होते. परंतु बस थांबली नाही. त्यानंतर आळंदी ते स्वारगेट बसमधून साधू वासवानी चौकात आले.

हे सुद्धा वाचा

असे अनुभव आले

संचिद्र प्रताप सिंह यांना काही चांगले अनुभवसुद्धा आले. एक व्यक्ती चुकून दुसऱ्या बसमध्ये बसली. वाहकाने त्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. प्रवास दरम्यान दोन वेळा त्यांच्या पासची तपासणी झाली. सिंह यांनी प्रत्येक विभागप्रमुखांना महिन्यातून एक दिवस बसमधून प्रवास करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे बससेवा अधिक चांगली करता येणार आहे. किती अधिकारी या निर्णयांची अंमलबजावणी करतील, हे लवकरच दिसेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.