पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार, काय असणार आहे नवीन पर्याय

100 इलेक्ट्रिक बसेसपैकी 20 इलेक्ट्रिक बस डबल डेकर आहेत. पुणे महापालिकेला 12 आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला 8 डबल डेकर बसेस देण्यात येणार आहेत.

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार, काय असणार आहे नवीन पर्याय
पुणे बस
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 1:47 PM

पुणे : मुंबईनंतर आता पुणे शहरात (Pune) डबल डेकर बस सुरु होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (pmpml)आता 300 नवीन बसेस खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. यातील 200 बस सीएनजीवर तर 100 बस इलेक्ट्रिकवर (new buses) धावणार आहेत. तसेच 20 डबल डेकर बस खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. परंतु पीएमपीने अद्याप डबल डेकर चालविण्यासाठी निश्चित केलेल्या मार्गांचे सर्वेक्षणच केलेले नाही. यामुळे महानगरपालिकेला आधी सर्वेक्षण करावे लागणार आहे.

300 नवीन बसेस खरेदी करण्यास मान्यता

मुंबईत अलीकडेच ई-डबल डेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा डबल डेकर बस धावण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तीनशे नवीन बस खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. यातील 200 बस सीएनजीवर तर 100 बस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत.

हे सुद्धा वाचा

20 इलेक्ट्रिक बस डबल डेकर

100 इलेक्ट्रिक बसेसपैकी 20 इलेक्ट्रिक बस डबल डेकर आहेत. पुणे महापालिकेला 12 आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला 8 डबल डेकर बसेस देण्यात येणार आहेत. निगडी भोसरी, कात्रज हडपसर बायपास, महापालिका ते हिंजवडी, कात्रज ते हिंजवडी या मार्गावर ही बस चालविण्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे, मात्र अद्याप यापैकी एकाही मार्गाचे सर्वेक्षण झालेले नाही.

पुणे महानगर परिवहन महामंडळाने डबल डेकर बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यासंदर्भातील मार्ग निश्चित केला नाही. त्या मार्गावर उड्डाणपूल, मोठी झाडे, फांद्या, ओव्हरहेड वायर्स याची माहिती पीएमपी प्रशासनाकडे नाही. महापालिका ते हिंजवडी दरम्यान धावणारी डबल डेकर बस बाणेर मार्गावरून धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र या मार्गावरील रस्त्यालगतची झाडे, चौकातील सिग्नल, खांब, रस्त्यावर लोंबकळलेल्या विद्युत तारा, उड्डाणपूल आदींची माहिती घेण्यात आली आहे.

या मार्गांचा विस्तार

पुणे परिवहन मंडळाने हडपसर-थेऊर रस्ता वाघोली, भारती विद्यापीठ-स्वारगेट ते शनिवारवाडा, राजस सोसायटी-स्वारगेट ते शिवाजीनगर आणि निगडी-नवलख उंब्रे ते ग्रीन बेस कंपनीपर्यंत मार्ग विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी येवलेवाडीहून पुणे रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांना दोन बस बदलाव्या लागत होत्या, मात्र आता मार्गाचा विस्तार झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांचा प्रवासही सुकर होणार आहे. इतर मार्गांवरही अशीच सुविधा उपलब्ध होणार आहे.

उरुळी कांचन ते नांदूरगाव, गुजरात कॉलनी ते पुणे रेल्वे स्टेशन, आळंदी ते खराडी, येवलेवाडी ते पुणे रेल्वे स्टेशन, हडपसर ते पुणे रेल्वे स्टेशन, शेववाडी ते एनटी वाडी डेपो, आळंदी ते तळेगाव डेपो, घरकुल आहेत. याशिवाय वसाहत ते पिंपरी गाव, भोसरी ते चिखली, आणि भोसरी ते कोथरूड आगारासाठीही नवीन बससेवा सुरू होणार आहे.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.