पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, आता एका अॅपने होणार अनेक कामे
Pune News: पीएमपीएमएलकडून एक अॅप विकसित करण्यात आले आहे. या एका अॅपने अनेक कामे होणार आहेत. पुण्यातील बसेससंदर्भात सर्व माहिती या अॅपवर मिळणार आहे. तसेच मेट्रोच्या तिकीटाची सुविधा मिळणार आहे. येत्या 17 ऑगस्टपासून हे अॅप सुरु होणार आहे.
पुणे देशातील सर्वात जलदगतीने विकसीत होणारे शहर आहे. देशभरातील नागरिक वास्तव्यासाठी देखील सर्वाधिक पसंती पुणे शहराला देत आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या पाहता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएलवर अवलंबून आहे. सर्वाधिक पुणेकर पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करतात. पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड ( पीएमपीएमएल ) पुणेकरांसाठी महत्वाची बातमी दिली आहे. पीएमपीएमएलकडून एक अॅप विकसित करण्यात आले आहे. या एका अॅपने अनेक कामे होणार आहेत. पुण्यातील बसेससंदर्भात सर्व माहिती या अॅपवर मिळणार आहे. तसेच मेट्रोच्या तिकीटाची सुविधा मिळणार आहे. येत्या 17 ऑगस्टपासून हे अॅप सुरु होणार आहे.
‘आपली पीएमपीएमएल’ अॅप
PMPL कडून नवीन मोबाईल ॲप करण्यात आले आहे. PMPL चे नवे ‘आपली पीएमपीएमएल’ हे बहुप्रतिक्षित मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च करण्यात आले. पुणेकरांना आता 17 ऑगस्टपासून अँड्रॉइड डिव्हाइसवर हे ॲप डाउनलोड करता येणार आहे. या अॅपवरुन वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण माहिती आणि सेवा मिळणार आहे.
काय, काय सुविधा मिळणार
‘आपली पीएमपीएमएल’ ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या ठिकाणापासून त्यांच्या इच्छित स्थळापर्यंतच्या सर्व बस मार्गांची माहिती देईल. तसेच या नव्या ॲप वरून पुणे मेट्रोचे तिकीट देखील बुक करता येणार आहे. या अॅपमध्ये लाईव्ह लोकेशन फीचर देखील असणार आहे. ॲपच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंग, युपीआय पेमेंट करता येणार आहे.
पुणे मेट्रो गणेशोत्सवापर्यंत पुणेकरांना मेट्रोने स्वारगेट प्रवास करता येणार आहे. त्यासाठी सिव्हील कोर्ट ते स्वारगेटपर्यंतचा मेट्रोच्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. हा संपूर्ण मार्ग भूमिगत मेट्रोचा आहे. गेल्या अनेक दिवासांपासून या मार्गाची प्रतिक्षा पुणेकरांना होती. परंतु आता तो लवकरच सुरु होणार असल्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना ही स्वारगेटपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.