Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे ‘पीएमपी’ गुगलवर, घरबसल्या कळणार कुठे आहे बस? काय आहे योजना

Pune News : पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक चांगला होणार आहे. पुणे शहरात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आरामदायी प्रवाशांचा अनुभव येणार आहे. तसेच बस कुठे आहे? हे सुद्धा कळणार आहे.

Pune News : पुणे 'पीएमपी' गुगलवर, घरबसल्या कळणार कुठे आहे बस? काय आहे योजना
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 12:20 PM

पुणे | 24 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोचा विस्तार आणखी वाढवण्यात येणार आहे. त्याचवेळी बस प्रवास अधिक चांगला करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसेस येणार आहेत. त्यासोबत आता गुगलवर पीएमपीची बस कुठे आहे? हे कळणार आहे. तसेच पीएमपीचे तिकीट ऑनलाईन काढता येणार आहे.

गुगलवर पीएमपी बस

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदाची सूत्र घेतल्यापासून बदल सुरु केले आहे. त्यांनी प्रवाशांसाठी अनेक चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरु केली आहे. आता पीएमपीसोबत गुगलचा करार झाला आहे. या करारानंतर गुगलला हवी असणारी माहिती देण्यात आली. यामुळे आता १४ पीएमपी बसेसमध्ये उपकरण बसवण्यात आले आहे. तसेच गुगलवरुन लाईव्ह लोकेशन मिळण्यासाठी चाचणी सुरु केली आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर सर्वच बसेस गुगलवर ट्रॅक करता येण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे पीएमपीची बस कुठे आहे? हे प्रवाशांना घरबसल्या समजणार आहे.

हे सुद्धा वाचा

तिकीट होणार ऑनलाईन

पीएमपीचे तिकीट ऑनालाईन करण्यात येणार आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाकडून अॅप, क्यूआरकोड, वेबसाइट याची मदत घेतली जाणार आहे. पीएमपी प्रशासनाने यासाठी बेस्टला संपर्क केला आहे. यामुळे बेस्टला ही सुविधा निर्माण करुन देणारी टीम लवकरच पीएमपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

रोज दोन लाख जणांचा प्रवास

पुणे शहरात पीएमपी बस सेवेच्या माध्यमातून रोज सुमारे दोन लाख जण प्रवास करतात. या सर्वांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यामुळे ‘पीएमपी’कडे असणाऱ्या सध्याच्या बसेसपैकी अनेक बसचे आयुर्मान संपलेले आहे. त्यामुळे ‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण ६५० बस घेण्यात येणार आहे. त्यासाठी या महिन्यात १९२ बसेस दाखल होत आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.