मास्क न घालणाऱ्या पुणेकरांना धडा, पोलिसांची 2 लाख 28 हजार जणांवर कारवाई

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात धडक कारवाई करण्यास सुरुवात केलीय.

मास्क न घालणाऱ्या पुणेकरांना धडा, पोलिसांची 2 लाख 28 हजार जणांवर कारवाई
मास्क
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 7:15 PM

पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात धडक कारवाई करण्यास सुरुवात केलीय. आज (23 फेब्रुवारी) दिवसभरात 902 जणांवर मास्क न घातल्याने कारवाई करण्यात आली. दिवसभरात नियम मोडणाऱ्यांकडून 4 लाख 46 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. आतापर्यंत एकूण 2 लाख 28 हजार 560 जणांवर मास्कची कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण 11 कोटी 6 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय (Pune Police action against no mask citizens amid Corona infection).

पुण्यात दुपारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज (23 फेब्रुवारी) दुपारपर्यंत तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. सोमवारी 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने आगामी काही दिवसांत पुण्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (pune corona patient becomes doubled in one day health department on alert)

कोरोना रुग्णांत दिवसेंदिवस वाढ

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सरकारने सावध पवित्रा धारण केला आहे. सरकारकडून वेगवेगळे प्रतिबंध घातले जात आहेत. तसेच, नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, एवढे सारे कारुनही काही शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार थांबण्याची चिन्हं दिसत नाहियेत. पुण्यात तर कोरोनाग्रस्तांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.

सरकारकडून काय उपायोजना

दरम्यान, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोनावर जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी ते येथील आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पिंपरी चिंचवड शहरात संचारबंदीची घोषणा केली आहे. येथे रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. रात्री (सोमवार) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.

तसेच पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी 28 फेब्रवारीपर्यंत शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अभ्यासिका सुरु असल्या तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य करण्यात आलं आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंतच खुले ठेवण्याची परवानगी आहे.

हेही वाचा :

धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट; आगामी काळात आणखी कडक निर्बंध?

कोरोना नियम मोडल्यास महापौरांवरही कारवाई करा; अमोल कोल्हे यांची मागणी

राज्यातील लोकांची कर्नाटक सीमेवर कडक अडवणूक, पण कर्नाटकचे ड्रायव्हर-कंडक्टर विनामास्क महाराष्ट्रात!

व्हिडीओ पाहा :

Pune Police action against no mask citizens amid Corona infection

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.