पुणे पोलिसांनी गाठली दिल्ली, ड्रग्ससंदर्भात सर्वात मोठी कारवाई
pune drug racket | पुणे शहरात काही महिन्यांपूर्वी ड्रग्स तस्कर ललित पाटील याला अटक झाली होती. त्याचा नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना होता. आता पुणे शहरात ड्रग्सचा कारखाना मिळाला आहे. त्याचे धागेदोरे दिल्लीपर्यंत आहे.
अभिजित पोते, दि. 21 फेब्रुवारी 2024 | पुणे सांस्कृतिक शहर म्हणून जगभर ओळखले जाते. परंतु आता पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. ड्रग्सची तस्करी होत आहे. पुणे शहरात ड्रग्सचा कारखाना दोन दिवसांपूर्वी मिळाला. मिठाच्या पाकिटात भरुन ड्रग्स विकले जात होते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. पुणे पोलीस या ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढात आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस दिल्लीत पोहचले. पोलिसांनी दिल्लीत 600 किलो ड्रग्स जप्त केले. दिल्लीत जाऊन पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
4000 कोटी रुपये किमतींचे ड्रग्स
पुणे पोलिसांकडून दिल्लीत पुन्हा 600 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. मंगळवारी पोलिसांनी दिल्लीत 400 किलो ड्रग्स जप्त केले होते. त्यानंतर पुणे पोलिसांकडून पुन्हा 600 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. आतापर्यंत पुणे पोलिसांनी जवळपास 2000 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 4000 कोटी रुपये किमतींचे ड्रग्स जप्त करण्यात आले.
पुणे पोलिसांना मिळाला कारखाना
पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये ड्रग्जचा कारखाना मिळाला होता. कुरकुंभ येथील एका केमिकल कारखान्यात ड्रग्सची निर्मिती होत होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले. त्यानंतर मिठाच्या पाकिटात भरुन ड्रग्स तयार केले जात असल्याचे दिसले. हा प्रकार पाहून पोलीस आवक झाले. कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम लॅबोरेटरीज कंपनीत हा प्रकार सुरु होता.
तीन जणांना अटक, कारखाना मालकाचा शोध
पुणे पोलिसांनी ड्रग्स रॅकेट प्रकरणात वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख या तिघांना अटक केली आहे. या तिघांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले. वैभन माने आणि हैदर शेख हे वर्षभरापूर्वी येरवडा कारागृहात होते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर या दोघांनी पुन्हा ड्रग्सची विक्री सुरु केली. या प्रकरणात अर्थकेम लॅबोरेटरीज या कंपनीच्या मालकाचा शोध सुरु आहे.
हे ही वाचा
नाव लॅबोरेटरीज पण निर्मिती ड्रग्सची, पुणे शहरात आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्सचा साठा जप्त