koyta gang : पुणे पोलिसांना कोयता गँगसंदर्भात सर्वात मोठे यश
पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगच्या म्होरक्याला पोलिसांनी अटक केली आहे. बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे हे गँगचे म्हरको होते. आरोपींकडून दोन कोयते जप्त केली आहेत.
पुणे : Pune Crime News कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी मोठी (Crime News) कारवाई केली आहे. या गँगचा म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे हे गँगचे म्होरके होते. आरोपींकडून दोन कोयते जप्त केली आहेत. यापुर्वी दोन दिवसांपुर्वी कोयता गॅंगविरोधातील मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केली होती. जंगली महाराज रस्त्यावर कोयते उगारुन दहशत माजवणाऱ्यांना अटक केली होती. पुण्यात होणारी जी-20 परिषद आगामी प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरु केली. पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला.
असे पकडले आरोपींना
पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँग, सराईत गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार, मोका मधील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आराखडा तयार केला. पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन रात्रभर राबवले. त्यात अनेक गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी ३ हजार ७६४ गुन्हेगारांची चौकशी गुन्हेगारांकडून पिस्तूल, काडतुसे, १४५ कोयते जप्त करण्यात आले. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. दरम्यान कोयता गँगचे अटक केले तिन्ही आरोपी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यांना पोलिसांनी पकडले.
अधिकाऱ्यांची केली नियुक्ती
पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्यांची नियुक्त या गँगला रोखण्यासाठी केली.
पुण्यात गुन्हेगारी वाढली :
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.