TET Exam : टीईटी परीक्षेत गैरप्रकाराचा संशय, पुणे पोलिसांकडून MSEC चे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक
टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे: टीईटी परीक्षेत गैरप्रकार (Maha TET exam) झाल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना काल चौकशीला बोलावल होत. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात (Mhada Paper Scam) अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख (Pritish Deshmukh) याच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. पुणे सायबर च्या कार्यालयांमध्ये ही चौकशीकरुन अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांकडून कालपासून चौकशी आज अटक
म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी एमएसईसीचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. गैरप्रकाराचा शोध घेण्यासाठी तुकाराम सुपे यांच्याकालपासून चौकशी करण्यात आल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.
कुंपणानं शेत खालल्याचा संशय
तुकाराम सुपेंना आज कोर्टात हजर करणार
महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आलीय. तुकाराम सुपे यांना कोर्टासमोर आज हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आरोग्य भरती, म्हाडा आता टीईटी परीक्षा
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड प्रवर्गाच्या भरतीप्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. आरोग्य विभागाच्या भरतीत विभागातील अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. तर, म्हाडा परीक्षेचं आयोजन करण्याची जबाबदारी असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रीतीश देशमुखला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता थेट टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना अटक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
इतर बातम्या:
फायनली…पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा उत्साहात सुरू, कोणते नियम पाळावे लागणार?