pune drug case: पुणे ड्रग्स व्हिडिओ व्हायरल, केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई

Pune Drug case: पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात पार्टी करणाऱ्या मुलांना पुणे पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहे. पार्टीसाठी आलेल्या मुलांची पुणे पोलीस चौकशी करणार आहे. ड्रग्स प्रकरणात पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.

pune drug case: पुणे ड्रग्स व्हिडिओ व्हायरल, केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई
pune drug case
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 11:02 AM

पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर वादळ निर्माण झाले आहे. सांस्कृतिक पुण्यात अल्पवयीन मुलेसुद्धा ड्रग्स सेवन करत असल्याचे प्रकारण समोर आले आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी रविवारी दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. मात्र अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई झाली नव्हती. या प्रकरणाची दखल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या आदेशानंतर कारवाई

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ड्रग्स प्रकरणाची गंभीर दाखल घेतली. त्यानंतर पुणे पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे सांगितले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांचे निलंबन करण्याची कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. तसेच संपूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलिसांची स्वतंत्र मोहिम सुरु करण्यात आली. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे.

महाविद्यालयांमध्ये कठोर मोहीम

पुण्यातील सर्व महाविद्यालये, पब्स, हॅाटेल्स आणि संशयास्पद ठिकाणी त्वरीत शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे. अमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? आता त्याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहीम सुरू करण्यात यावी, अशाही सूचना मुरलधीर मोहोळ यांनी दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

त्या मुलांची चौकशी होणार

पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात पार्टी करणाऱ्या मुलांना पुणे पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहे. पार्टीसाठी आलेल्या मुलांची पुणे पोलीस चौकशी करणार आहे. ड्रग्स प्रकरणात पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्या आरोपींना रविवारी अटक केली आहे. पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बार मालकांसह मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकूण चार कलमे लावली आहे. अटक केलेल्या आठही जणांना पुणे पोलीस कोर्टात हजर करणार आहे. पुणे ड्रग्स प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन रविवारी केले होते. पोलीस दलातील 2 बिट मार्शलवर कारवाई करण्यात आली होती. कामात हलगर्जीपणा केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.