Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime News : दहा, वीस नव्हे तर तब्बल दीडशे घरफोड्या, पण शेवटी…कोण आहे आरोपी

Pune Crime News : पुणे शहरातील एका अट्टल गुन्हेगाराच्या शोधात पोलीस होते. त्याने दहा, वीस नव्हे तर तब्बल दीडशे घरफोड्या केल्या होत्या. अनेक वर्षांपासून तो फरार होता. शहरातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल होते. अखेर...

Pune Crime News : दहा, वीस नव्हे तर तब्बल दीडशे घरफोड्या, पण शेवटी...कोण आहे आरोपी
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 8:54 AM

पुणे | 8 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात नेहमी घरफोडया करुन फरार होणाऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस होते. त्याने दहा, वीस नव्हे तर तब्बल दीडशे घरफोड्या केल्या होत्या. परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले गेले. नेहमीचकवा देऊन तो फरार होत होता. गुन्हेगारांचे अपराध कधीतरी पूर्ण होतात, त्या पद्धतीने त्याच्या अपराधांचा कोटा पूर्ण झाला अन् अखेर पुणे पोलिसांच्या सापळ्यात तो आला. यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

काय आहे घरफोड्याचा मास्टर

तब्बल दीडशे घरफोडीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे येथील कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर हडपसर, बिबवेवाडी, सासवड, अलंकार, लोणीकंद, खेड, कोथरूड, दत्तवाडी, पंढरपूर, वानवडी पोलीस ठाण्यावर गुन्हे दाखल होते. संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (40, रा. थेऊर रोड, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 37 तोळे वजनाचे 22 लाख 20 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

साथीदारच्या मदतीने करत होता घरफोड्या

आरोपी संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी याला कोंढवा पोलिसांनी पकडले आहे. तो मध्यरात्रीच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करत होता. त्याच्यावर यापूर्वी दीडशे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. परंतु अनेक वर्षांपासून तो फरार होता. पोलिसांना सापडतच नव्हता. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्यात तो अडकला.

तपासातून मिळणार महत्वाची माहिती

संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी याला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासात यासंदर्भात काय माहिती उघड होते, हे ही आता काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. आरोपी कल्याणी याने फक्त पुणे शहरात घरफोड्या केल्या की इतर ठिकाणी केल्या, हे आता स्पष्ट होणार आहे.

कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.