Pune News | कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा

Pune Crime News | पुणे शहरात कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांकडे उपचारासाठी आणलेल्या या कुत्र्याच्या मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी दोन डॉक्टरांसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कुत्र्याच्या मृत्यूमुळे डॉक्टरावर गुन्हा दाखल होण्याचा हा पुणे शहरातील पहिलाच प्रकार असण्याची शक्यता आहे.

Pune News | कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 9:53 AM

पुणे, दि. 25 नोव्हेंबर 2023 | पुणे शहरात एक वेगळीच घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या कुत्र्यास उपचारासाठी पेट क्लिनिकमध्ये आणले. त्यावेळी उपचार करताना कुत्र्याचा मृत्यू झाला. मग त्या महिलेने डॉक्टरासह चार जणांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीनंतर दोन डॉक्टरांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील पाषण भागात ही घटना घडली. या भागात असलेल्या विगल्स माय पेट क्लीनिकमध्ये महिलाच्या बारा वर्षीय कुत्र्याचा मृत्यू झाला होता. कुत्र्याच्या मृत्यूमुळे डॉक्टरावर गुन्हा दाखल होण्याचा हा पुणे शहरातील पहिलाच प्रकार असण्याची शक्यता आहे.

काय घडला नेमका प्रकार

पुणे येथील एक 35 वर्षीय महिलाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ती तिच्या कुत्र्याला लस देण्यासाठी पाषणामधील विगल्स माय पेट क्लीनिकमध्ये आली होती. क्लीनीकमध्ये त्या महिलेने लस देण्यासाठी कुत्र्यास डॉक्टराकडे दिले. यावेळी डॉ. शुभम राजपूत (वय 35) यांनी क्लीनीकमधील दोघांच्या मदतीने पट्टाने झाडाला बांधला. परंतु त्या पट्यामुळे त्या कुत्र्यास फाशी लागली. घटनेच्या पंधरा मिनिटानंतर डॉक्टरांच्या सहायकांनी त्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याची माहिती महिलेला दिली.

हे सुद्धा वाचा

घटनेनंतर डॉक्टर रुग्णालयातून फरार

घटनेनंतर डॉ. संजीव राजाध्यक्ष आणि डॉ. शुभम राजपूत यांनी महिलेला काही माहिती दिली नाही. ते रुग्णालयातून फरार झाले. यामुळे महिलेने चतुश्रृंगी पुलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृत्यू झालेला कुत्रा हा 40 दिवसांचा असतानापासून आपण त्याला पाळत होतो. आता तो 12 वर्षांचा होता, असे त्या महिलेने सांगितले. हनी नावाचा हा कुत्रा लैब्राडोर जातीचा होता. प्राण्यांना मारल्यास 6 महिन्यांची शिक्षेची तरतूद आहे. परंतु प्राण्यांचा मृत्यू झाल्यास किती शिक्षा होईल? यावर आता सोशल मीडियात चर्चा सुरु आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.