Pune : दहीहंडीसाठी पुणे पोलिसांनी नियमावली केली जाहीर केली, रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार

पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल केला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली आहे.

Pune : दहीहंडीसाठी पुणे पोलिसांनी नियमावली केली जाहीर केली, रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार
दहीहंडीसाठी पुणे पोलिसांनी नियमावली केली जाहीर केली, रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 7:46 PM

पुणे : कोरोनामुळे (Corona) दोन वर्षानंतर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीसाठी पुणे पोलिसांनी नियमावली केली जाहीर केली आहे. पुण्यात यंदा रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार आहे. दहीहंडीच्या दिवशी पुणे पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवणार आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहेत. दहीहंडीच्या (Dahi Handi) पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर वाहतूक पोलिसांचे (Pune city Police) आवाहन केले आहे.

दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते.

पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,

पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल केला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली आहे. पुण्यात प्रत्येक दहीहंडीच्या दरम्यान वाहतुक कोंडी होत असते त्यामुळे यावर्षी प्रशासनाने नवा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

असे असतील पर्यायी मार्ग

  1. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
  2. पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, टिळक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जावे.
  3. स. गो. बर्वे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी चौकातून डावीकडे वळून महापालिकेकडे जावे.
  4. मजुर अड्डा चौकातून अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात येईल. त्यामुळे अप्पा बळवंत चौकातून मजुर अड्डा चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्याने पुढे जाईल.
  5. रामेश्‍वर चौक ते शनिपार चौकाकडे जाणारी आणि सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्याने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.