Pandharpur wari : पालखी सोहळ्यावर पोलिसांसोबत ड्रोनचीही असणार नजर; वारकऱ्यांसाठी 4 हजार पोलीस तैनात
पालखी सोहळ्यानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून वारकऱ्यांची विशेष काळजीही घेतली जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे वारकऱ्यांची काळजी घेण्यात येत असून पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये करण्यात येणारे वाहतुकीचे बदल आणि उपलब्ध पर्यायी मार्गांची माहिती आणि एकूणच वारीदरम्याच्या घडामोडींवर पुणे पोलिसांतर्फे व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
पुणेः आजपासून पालखी सोहळ्याला (Palkhi Sohala) सुरवात होत आहे, संत तुकाराम महाराजांची पालखी आज मार्गस्थ होणार आहे तर उद्या आळंदीमधून माऊलींची पालखी (Alandi Palkhi) निघणार आहे. आणि 22 आणि 23 रोजी पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहेत. त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनीदेखील (Pune Police) सुरक्षेच्या दृष्टीने कंबर कसलेली पाहायला मिळतं आहे. पालखीच्या पार्श्वभूमीवर शहरात जवळपास 4 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत. त्याचबरोबर पुणे पोलीस पहिल्यांदाच वारी सोहळ्यात ड्रोनचादेखील वापर करणार आहेत, यावेळी वारकऱ्यांना आणि सामान्य लोकांनासुद्धा पालखीचं लाईव्ह ट्रेकिंग करता येणार आहे.
#Pune citizens & all visitors who plan to travel to Pune around this time, PLS MAKE A NOTE of these IMPORTANT DATES. #share
लाइव्ह पालखी ट्रॅकिंग URL लवकरच शेअर केली जाईल. ..#PunePolice #Wari2022 pic.twitter.com/WESBLIhpnc
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) June 17, 2022
वारकऱ्यांना आणि सामान्य लोकांनासुद्धा पालखीचं लाईव्ह ट्रेकिंग करता यावे त्यासाठी diversion.punepolice.gov.in हे संकेत स्थळ पुणे पोलिसांकडून लाईव्ह करण्यात आलं असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
धारकऱ्यांनी परवानगीशिवाय पालखीत घुसायचं नाही
त्याचबरोबर शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि त्यांचे धारकरी हे दरवर्षी पालखीत सहभागी होत असतात मात्र यावर्षी पोलीस परवानगीशिवाय पालखी सोहळ्यात कोणालाही घुसता येणार नाही असं विधानदेखील अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे.
वारकऱ्यांची विशेष काळजी
पालखी सोहळ्यानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून वारकऱ्यांची विशेष काळजीही घेतली जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे वारकऱ्यांची काळजी घेण्यात येत असून पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये करण्यात येणारे वाहतुकीचे बदल आणि उपलब्ध पर्यायी मार्गांची माहिती आणि एकूणच वारीदरम्याच्या घडामोडींवर पुणे पोलिसांतर्फे व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी शौचालयांची व्यवस्था
या सोयी सुविधेबरोबरच वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, मुक्काम असणाऱ्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पालखी सोहळा होत असला तरी कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.