पुणेकरांनो मॉर्निंग वॉक जाताना दिसेल पोलिसांचा फौजफाटा, काय आहे कारण वाचा
पुणे पोलीस पुण्यातील नागरिकांना मॉर्गिंग वॉक करताना अनेक ठिकाणी दिसणार आहे. पोलीस कोणत्या राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी असणार आहेत का?
पुणे : मॉर्निंग वॉक (Morning Walk) आरोग्यासाठी लाभदायक असते. यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणारे अनेक जण मॉर्निंग वॉकला नियमित जात असतात. परंतु मॉर्निंग वॉकसाठी जाताना काही वेळा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास होत असतो. परंतु पुणेकरांनो तुम्ही मॉर्निंग वॉक बिनधास्त करा. कारण पुणे पोलीस (Pune Police) तुम्हाला मॉर्गिंग वॉक करताना अनेक ठिकाणी दिसणार आहे. तुमच्या मॉर्निंग वॉकच्या रस्त्यावर पोलीस का असणार? का घेतला आहे पुणे पोलिसांनी हा निर्णय? पाहूया.
पुणे शहरात 32 पोलीस स्टेशन अतंर्गत 85 ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन (Railway Station), बस स्टँड, विविध बाजार (Market), शहरातील महत्वाचे भाग या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना पोलिसांची सुरक्षा (Protect) राहणार आहे. यासाठी पोलिसांनी 85 (Police ) जागा निश्चित केल्या आहेत. त्या ठिकाणी कोणत्या राजकीय व्यक्तींसाठी नाही तर महिला अन् ज्येष्ठ व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पुणे शहर पोलीस तैनात असणार आहे.
पुणे शहरातील 32 पोलीस ठाण्या अतंर्गत येणाऱ्या 85 ठिकाणी ही सुरक्षा असणार आहे. पोलिसा आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त संदीप कर्णिक, पाच पोलीस उपायुक्त, 28 पोलीस निरीक्षक, 47 सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक आणि 222 पोलीस मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचे संरक्षण करणार आहे.
कोणावर दिली जबाबदारी
सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाले, अपर आयुक्त रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त,संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस आमंलदार यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे.
संदीप देशपांडे यांच्यांवर झाला होता हल्ला
मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. संदीप देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले होते.