पुणे पोलिसांची धडक कारवाई, गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी घेतली ही मोठी ॲक्शन

Pune Crime News : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे यासंदर्भात आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. शहरातील गुन्हेगारी मोडण्यासाठी पुणे पोलीस आक्रमक झाले आहे.

पुणे पोलिसांची धडक कारवाई, गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी घेतली ही मोठी ॲक्शन
Pune PoliceImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 2:31 PM

पुणे | 27 जुलै 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होत नाही. कोयता गँगचा उपद्रव सुरु आहे. व्यापाऱ्यावर हल्ला झाला. बलात्काराची घटनाही घडली. या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी बंदोबस्त केला असला तरी गुन्हेगारी कमी होत नाही. यामुळे कसबा मतदार संघातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. आता या प्रकरणी पुणे पोलीस आक्रमक झाले आहे. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

काय सुरु पोलिसांनी सुरु

शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. पोलिसांनी शहरातील ६ हजार ११६ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. त्यापैकी ६०२ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगाराची घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे.

हे सुद्धा वाचा

शस्त्र बाळगणाऱ्यांची खैर नाही

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांची आता खैर नाही. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. तसेच जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये २८ जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील बस स्थानके रेल्वे स्थानक हॉटेल लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी करून संशयित वाहन चालकांची चौकशी केली जात आहे. नाकाबंदीत 934 वाहन चालकांची तपासणी केली आहे. २१३ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.

आयुक्त रस्त्यावर

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार काही दिवसांपूर्वी स्वत: रस्त्यावर उतरले होते. पुणे शहरातील सर्व पोलीस चौक्यांमध्ये २४ तास पोलीस राहणार आहेत. कामात हलगर्जी करणाऱ्यांवर बडतर्फे आणि निलंबनाची कारवाई रितेश कुमार यांनी केली. या कारवाईनंतर पोलीस दलात चांगली खळबळ माजली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.