पुणे : Pune Crime News कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी मोठी (Crime News) कारवाई केली आहे. या गँगचा म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून कोयते जप्त केली आहेत. पुण्यात होणारी जी-20 परिषद आगामी प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरु केली. आता पोलिसांनी या सर्व गुंडांवर मोठी कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँग, सराईत गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार, मकोकामधील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आराखडा तयार केला होता. त्यानुसार पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन रात्रभर राबवले. त्यात अनेक गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी ३ हजार ७६४ गुन्हेगारांची चौकशी गुन्हेगारांकडून पिस्तूल, काडतुसे, १४५ कोयते जप्त करण्यात आले.
पोलिसांनी आता कोयता गँगमधील १३ जणांवर मकोका लावला आहेत. त्यात म्होरक्या समिर लियाकत पठाण याचा समावेश आहे. समिर लियाकत पठाण (वय-२६ हडपसर, पुणे), शोएब लियाकत पठाण (वय २०, हडपसर पुणे) , गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, (वय २२ मांजरी, पुणे, प्रतिक ऊर्फ एस के हनुमत कांबळे (वय २० मांजरी, पुणे), गितेश दशरथ सोलनकर (वय २१ हडपसर पुणे), ऋतिक संतोष जाधव, (वय- १९ मांजरी, पुणे ), साई राजेंद्र कांबळे, (वय-२० मांजरी, पुणे), ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय २४ मांजरी, पुणे) , ऋतिक सुनिल मांढरे, (वय २२ मांजरी रोड,हडपसर पुणे १० ), प्रतिक शिवकुमार सलगर, (वय १९ मांजरी, पुणे) तसेच इतर आरोपी अल्पवयीन आहेत.
हा आहे म्होरक्या
यातील आरोपी समिर लियाकत पठाण हा टोळी प्रमुख आहे. त्याचे इतर साथीदार शोएब लियाकत पठाण, गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार यांचेवर पुणे शहरात वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, मारामारी, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहे.
पवारांनी विधानसभेत मांडला मुद्दा
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.