अरे वा, पुणेकर वाहतूक पोलीसही वेगळाच, हेल्मेट जनजागृतीसाठी श्वानाचा असा केला वापर, पाहा Video

वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी पुणेरी लोक प्रसिद्ध आहेत. पुणे शहरातील वाहतूक पोलिसाने अनोखी शक्कल केली आहे. या पोलिसाने हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी श्वानालाही हेल्मेट घातलेय. त्यांच्या या फंड्याला सोशल मीडितातून चांगला प्रतिसाद मिळतोय.

अरे वा, पुणेकर वाहतूक पोलीसही वेगळाच, हेल्मेट जनजागृतीसाठी श्वानाचा असा केला वापर, पाहा Video
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 12:16 PM

अभिजित पोते, पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हणतात, ते उगाच नाही. आतापर्यंत पुणेरी पाट्या, पुणेकरांची दुपारची झोप, असे किस्से आपण ऐकलेले आहेत. पुणेरी पाट्या जितक्या प्रसिद्ध आहेत, तितकीच पुण्यातील लोकांचे वेगळेपण प्रसिद्ध आहे. यामुळेच पुणे शहरातील लोकांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्याला चांगल्या कॉमेंटही मिळत असतात. अगदी राजकीय विषयांवर कोटी पुणेरी पाट्यांमधून केली जाते. पुणेरी पाट्या लागल्याशिवाय निवडणूक संपतच नाहीत. आता पुणे शहरातील वाहतूक पोलीसाने हेल्मेटसंदर्भात जनजागृतीसाठी वापरलेला हा फंडा सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आलाय.

काय केली शक्कल

पुण्याच्या वाहतूक पोलिसाने अनोखी शक्कल केली आहे. या पोलिसाने हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी श्वानालाही हेल्मेट घातलेय. वाहतूक विभागाचे पोलिस नाईक आतिश खराडे यांनी नागरिकांना हेल्मेट घालण्याच आवाहन करण्यासाठी थेट त्यांच्या पाळीव श्वानाला हेल्मेट घातले आहे. यासंदर्भात त्यांनी जनजागृती सुरू केलीय. त्यांच्या दुचाकीवर श्वानला बसवले असून त्याला हेल्मेट घातले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यात सर्वाधिक वाहन

देशात सर्वाधिक वाहने पुणे शहरात आहे. पुणे शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर अपघातही वाढले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे काही वर्षांपूर्वी हेल्मेट सक्ती पुण्यात करण्यात आली होती. पुण्यात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात होती. मात्र आता पोलिसांनी सक्तीपेक्षा जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

तंत्रज्ञानाचा सुरु केला वापर

पुणे पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात हेल्मेट न घालणाऱ्या २४ हजार ३६१ जणांवर कारवाई केली. जानेवारीचा विचार करता फेब्रुवारीतील कारवाई केवळ ३० टक्केच लोकांवर कारवाई केली आहे. त्यात रस्त्यांवर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून केवळ २२ जणांवर कारवाई केली गेली. उर्वरित कारवाई सीसीटीव्हीद्वारे केली आहे. यामुळे हेल्मेट वापरासंदर्भात तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पुणे पोलिसांनी भर दिलीय.

पुणेकर असणारे अजय बंगा सांभाळणार जागतिक बँकेची चावी, कशी झाली निवड निश्चित…हे वाचा

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....