Pune gangster:आता पुणे पोलीस करणार गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची चौकशी, सिद्धू प्रकरणातील मारेकरी संतोष जाधवचा तपास लावणार

संतोष जाधवच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीच लूकआऊट नोटीस बजावली आहे. तो पंजाब, हरियाणा परिसरात असल्याची माहितीही पोलिसांना होती. आता सिद्धू हत्येप्रकरणात त्याचे नाव आल्याने आता गँगस्टर लॉरेन्सचीच चौकशी करण्यात येणार आहे.

Pune gangster:आता पुणे पोलीस करणार गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची चौकशी, सिद्धू प्रकरणातील मारेकरी संतोष जाधवचा तपास लावणार
संतोष जाधव/सौरव महाकाळ मारेकरी, चौकशीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 1:51 PM

पुणे – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi singer Siddhu Moosewala)याच्या हत्याकांडात महाराष्ट्रातील दोन शूटर्स (shooters from Maharashtra) असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. हे दोन्हीही शूटर्स हे पुणे जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. त्यातील एकाचे नाव सौरव महाकाळ असे असून, त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा मारेकरी संतोष जाधव हा अद्यापही फरार आहे. या संतोष जाधवच्या शोधासाठी आता पुणे पोलीस, तिहार जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिष्णोई (Gangster lawrence Bishnoi)याची चौकशी करणार आहेत. एका खूनाच्या प्रकरणात फरार असलेला संतोष हा पंजाब, हरियाणा परिसरात असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडे होती. आता सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात त्याचे नाव आल्याने, संतोष जाधव सध्या लॉरेन्स बिष्णोईच्या गँगमध्ये सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे.

कोण आहे संतोष जाधव

संतोष जाधव हा सिद्धू प्रकरणातील एक मारेकरी आहे. तो मुळचा पुण्यातील मंचरचा रहिवासी आहे. मंचरच्या ओंकार उर्फ राण्या बाणखेले याच्या हत्येनंतर, तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संतोष जाधव हा २३ वर्षांचा आहे आणि त्याची आई मंचरलाच राहते. तर त्याची पत्नी कोल्हापूरला राहात असल्याची माहिती आहे. संतोष जाधवच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीच लूकआऊट नोटीस बजावली आहे. तो पंजाब, हरियाणा परिसरात असल्याची माहितीही पोलिसांना होती. आता सिद्धू हत्येप्रकरणात त्याचे नाव आल्याने आता गँगस्टर लॉरेन्सचीच चौकशी करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

महाकाळच्या चौकशीत सलमानच्या धमकीचा कट उघड

दरम्यान सलमान खानला धमकी देणारे पत्र गँगस्टर लॉरेन्सने स्वता लिहिले, असल्याचा दावा पुण्यातून अटक केलेल्या शूटर महाकाळने केला आहे. तसेच ही चिठ्ठी गोल्डी बरारने सलीम खानपर्यंत पोहचवली असेही त्याने सांगितले आहे. मुंबई क्राईम ब्रांचने महाकाळच्या केलेल्या चौकशीत हे सत्य समोर आले आहे. लॉरेन्सने स्वता ही चिठ्ठी लिहिली. त्यानंतर गोल्डी ब्रारने ही चिठ्ठी राजस्थानातील बिष्णोई गँगच्या माध्यमातून सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केल्याची माहिती महाकाळने दिली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार यांनी मिळून सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. सिद्धूच्या हत्येनंतर या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणारी पोस्टही गोल्डी ब्रारने दिल्याची माहिती आहे. पुणे पोलीस करणार असलेल्या तपासात संतोष बाबतची अधिक माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.