एआर रहमान यांचा शो पोलिसांनी बंद केल्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल, रहमानने ट्टिवट् केले…

pune police and a r rahman : एआर रहमान यांचा शो ऐन रंगात आलेला असताना पुणे पोलिसांनी त्यांचा शो बंद केला. यासंदर्भातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारीही संतापताना दिसत आहेत. याबाबत रहमान यांनी ट्विट केले आहे.

एआर रहमान यांचा शो पोलिसांनी बंद केल्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल, रहमानने ट्टिवट् केले...
AR RahmanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 12:08 PM

पुणे : प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांना पुणे पोलिसांनी सोमवारी चांगलाच दणका दिला. रहमान यांचा शो ऐन रंगात आलेला असताना पोलिसांनी त्यांचा शो बंद केला. रहमान यांच्या शोमध्ये पोलीस गेल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. पोलिसांनी स्टेजवर येऊन रहमान यांचा शो बंद पाडला. एवढेच नाही तर म्युझिक बँडसह कलाकारांनी तेथे जाऊन सर्व काही तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारीही संतापताना दिसत आहेत. दरम्यान शो नंतर रहमान यांनी ट्विट केले आहे.

का बंद केला शो

हे सुद्धा वाचा

डीसीपी झोन ​​2 स्मार्तना पाटील म्हणाल्या, की 10 वाजले त्यानंतरही रेहमान गात राहिला. दहा वाजेनंतर सार्वजिनक कार्यक्रम करता येत नाही. यामुळे घटनास्थळी असलेल्या आमच्या पोलीस अधिकार्‍यांनी त्यांना न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधांची माहिती देत शो तातडीने थांबविण्याचे निर्देश दिले.

रहमान यांचे ट्टिवट

कार्यक्रमानंतर रहमान यांनी ट्टिवट केले. त्यामध्ये म्हटले की, कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आलेल्या प्रेम आणि उत्साहाबद्दल पुण्याचे आभार. मात्र, त्यांनी पोलिसांसोबत झालेल्या घटनेचा कोणताही उल्लेख केला नाही. रहमानने ट्विट केले, “पुणे, काल रात्री तुम्ही दाखवलेल्या सर्व प्रेम आणि उत्साहाबद्दल धन्यवाद! किती छान कार्यक्रम! आम्ही लवकरच तुमच्यासोबत गाण्यासाठी परत येऊ.’

रहमानसोबत पत्नीही होती चर्चेत

रहमान एका कार्यक्रमामुळे चर्चेत होते. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही स्टेजवर दिसली. खरं तर, त्या व्हिडिओमध्ये रहमान आपल्या पत्नीला हिंदीत नव्हे तर तमिळमध्ये बोलण्यास सांगत होता. याबाबत पण त्याच व्हिडिओमध्ये रहमानची पत्नी इंग्रजीत स्पष्टीकरण देताना दिसली की तिला तमिळ येत नाही.

अन् हिरमोड झाला…

एआर रहमान यांचा कार्यक्रम म्हटल्यावर पुणे आणि पिंपरीचिंचवडसह लांबून लोक कार्यक्रमाला आले होते. रहमान यांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमात प्रचंड जल्लोष सुरू होता. रहमान यांच्या प्रत्येक गाण्यावर त्यांचे चाहते थिरकत होते. शिट्या वाजवत होते. तसेच त्यांच्या सोलो गाण्याचा मनमुराद आनंदही लुटत होते. मात्र, पोलिसांनी रात्री 10 नंतर कार्यक्रम थांबवल्याने रहमान यांनाही कार्यक्रम बंद करावा लागला. त्यामुळे रहमान यांच्या संगीताची जादू ऐकण्यासाठी आलेल्या त्यांच्या चाहत्यांचा प्रचंड हिरमोड झाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.