Pune Crime | पुणे रावडेवाडी दोन गटातील हाणामारी प्रकरणात पोलिसांकडून मोठे अपडेट

Pune Crime | पुणे जिल्ह्यांत दोन गटात वाद झाला होता. या प्रकरणात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. शुक्रवारी झालेल्या या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी महत्वाचे अपडेट दिले आहे. गावात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.

Pune Crime | पुणे रावडेवाडी दोन गटातील हाणामारी प्रकरणात पोलिसांकडून मोठे अपडेट
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 11:34 AM

पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन, चार दिवसांपासून खून आणि हाणामारीचे प्रकार घडत आहे. गणपती विसर्जन होत असताना पुणे शहरातील दोन गुंड टोळ्यांमधील वाद समोर आला होता. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर शुक्रवारी सिंहगड रोडवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलाचा खून झाला होता. या घटनांमुळे पुण्यात खळबळ माजली असताना पुणे जिल्ह्यात तुफान हाणामारीचा प्रकार पुरंदर तालुक्यातील रावडेवाडीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी महत्वाचे अपडेट दिले आहे.

कोणत्या कारणावरुन झाला होता वाद

भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी या प्रकरणी महत्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी येथील वाद शुक्रवारी रात्री झाला होता. हा वाद गावातील विकास कामावरून झाला होता. या वादात झालेल्या मारहाणीमुळे एकाचा मृत्यू झाला होता तर तिघेजण जखमी झाले होते. सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला होता. या हाणामारीत यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघेजण गंभीर जखमी झाले.

किती जणांना केली अटक

वादानंतर गावात शांतता निर्माण करण्यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचवेळी पोलिसांची पथके तयार करुन आरोपींना पकडण्यासाठी रवाना करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली आहे. यामध्ये तीन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तसेच इतर सहा आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

तलवार, रॉडचा वापर

दोन्ही गटातील वादात मिळेल त्या साहित्याचा आणि शस्त्राचा वापर करण्यात आला. तलवार, गज, रॉड यांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. तसेच डोळ्यात मसालाही टाकण्यात आलाय. गावात झालेल्या विकास कामाच्या श्रेयावरुन हा वाद झाला आहे. गावात अजून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.